आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट! लगेचंच करा ‘हे’ काम, नाहीतर… | Aadhaar card big update

Aadhaar card big update: सरकार 65 हजार नागरिकांचे आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. UIDAI (युनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने 10 वर्षांहून जुने आधारकार्ड धारकांना माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारने अनेक वेळा आधारकार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख दिली आहे, तरीही अनेक नागरिकांनी अद्याप आपले आधारकार्ड अपडेट केलेले नाही.

आधारकार्ड अपडेट का आवश्यक आहे?

आधारकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे, ज्यामुळे आपण विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. तसेच, गेल्या 10 वर्षांमध्ये आपला फोटो आणि पत्ता बदलला असल्यास, आधारकार्ड अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे फसवणुकीच्या घटनांना प्रतिबंधित करण्यास मदत होईल आणि शासनाला तयाची योग्य माहिती मिळेल.

हे पण वाचा:  महाराष्ट्रातील 'या' ३ नद्या जोडण्यास मंजुरी; या भागातील शेती होणार कायम बागायती..

आधारकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी:

  1. MyAadhaar पोर्टलवर जा: सर्वात आधी ‘MyAadhaar’ या पोर्टलवर लॉगिन करा.
  2. आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका: आपल्या आधार क्रमांकासह मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: तिथे विचारण्यात आलेले कागदपत्रे अपलोड करा, जसे की रेशनकार्ड, आधार नोंदणीचा प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी.
  4. अपडेट सेवेसाठी अर्ज करा: या प्रक्रियेद्वारे आपले आधारकार्ड अद्यतनित करणे पूर्ण करा.
हे पण वाचा:  आता LIC देणार आयुष्यभर १ लाख रुपयांची पेन्शन, वाचा कसा आहे 'प्लान' | LIC New Jeevan Shanti pension plan

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • रेशनकार्ड
  • मदतान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • मनरेगा/एनआरईजीएस जॉब कार्ड
  • श्रम कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • पॅन/ई-पॅन कार्ड
  • सीजीएचएस कार्ड
  • ड्राइविंग लायसन्स

आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख

UIDAI ने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 ची अंतिम तारीख दिली आहे. याआधी ही तारीख तीन वेळा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधारकार्ड अपडेट केलेले नाही, त्यांनी तातडीने अद्यतन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या अंतिम तारीखेनंतर, जर अपडेट केले नाही, तर आधार कार्ड रद्द होऊ शकते

हे पण वाचा:  लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या...