Borewell Anudan Yojana: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायी योजना तयार करून त्या राबविल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरावर शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी योग्य सोय उपलब्ध व्हावी म्हणून शंभर टक्के अनुदानावर सुविधा पुरविल्या जात आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, नवीन विहिरींचे खोदकाम, बोरिंग, सूक्ष्म सिंचन प्रणाली तसेच पीव्हीसी पाईप बसवणे आणि जुन्या विहिरींची दुरुस्ती करणे यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
बोरवेल अनुदान योजना
महाराष्ट्र सरकारकडून नुकतंच जाहीर करण्यात आले आहे की, सरकार आता बोरवेल घेण्यासाठी या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अनुदान मदत म्हणून देणार आहे. या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहेत? त्यासाठी असणारे का आवश्यक कागदपत्र कोणती? त्याचे अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे? यासंबंधीचे अधिक सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
सिंचनासाठी शेतकऱ्यांना मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी विविध योजना तयार केल्या गेल्या आहेत. मागील पाच वर्षांपासून अनेक शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत. स्वतःच्या शेतामध्ये शेततळे किंवा विहीर खोदकाम करून पाण्याची सोय उपलब्ध करून घेत आहेत.
कोणते अर्जदार पात्र असतील
अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी कोणतीही सुविधा जसे की विहीर, बोरवेल, शेततळे, नदी, पाट उपलब्ध नाहीत अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शेतीच्या उत्पादन वाढीला चालना द्यावी.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना बोरवेल अनुदानासाठी कोणते अर्जदार पात्र असतील याचा सविस्तर आढावा जाणून घेऊ.
या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा. अर्जदाराकडे जातीचा वैध दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर शेती असावी.
हे पण वाचा » LIC ची जबरदस्त योजना! महिलांना देणार ७००० रुपये महिना; जाणून घ्या सविस्तर
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बोरवेल अनुदानासाठी अर्जदाराकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे अधिक माहिती आपण जाणून घेऊ..
अर्जदाराकडे आधार कार्ड, जातीचा वैध दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीचा सातबारा आणि आठ अ उतारा तसेच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र केलेले असावे, 0.40 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असल्याचा तलाठी कार्यालयाचा दाखला असावा, आपल्या क्षेत्रांमध्ये विहीर नसल्याचा दाखला असावा, पाचशे फुटांच्या मर्यादेमध्ये परिसरात अन्य कोणतीही विहीर नसावी, कृषि अधिकार्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र असावे, गट विकास अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र असावे, जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव मंजूर असावा.
योजनेचा अर्ज कसा करावा?
राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजना या महाडीबीटी पोर्टल मार्फत राबविण्यात येत आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही देखील महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या पोर्टलवर लॉगिन करून शेतकरी योजना या विभागाअंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा पर्याय निवडून आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घेण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात संपर्क करावा.