BSNL new recharge plan: सध्या अनेक मोबाईल कंपन्यांची ऑफरची शर्यत सुरू आहे. रिचार्ज च्या पैशांमध्ये कॉलर ट्यून, OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन, SMS, इंटरनेट, कॉलिंग, अनलिमिटेड डेटा अशा अनेक फायद्यांचा समावेश रिचार्ज प्लॅन मध्ये केला जात आहे. पण मागील दोन महिन्यांपासून रिचार्ज प्लॅन चे दर वाढलेले आहेत. सर्व कंपन्यांनी ही दरवाढ केली असली तरीही BSNL मात्र यामध्ये अपवाद आहे.
बीएसएनएल ने अतिशय कमी पैशात चांगले प्लॅन लॉन्च केले आहेत. तुम्ही देखील परवडणाऱ्या किमतीमध्ये जास्त डेटा तसेच कॉलर ट्यून, ओटीटी प्लॅटफॉर्म यांचे सबस्क्रीप्शन मिळवण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला BSNL चा एक असा प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये एक ना अनेक फायदे तुम्हाला मिळू शकणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बीएसएनएल चा 600 GB डेटा प्लॅन
बीएसएनएल कंपनीने तब्बल 600 GB डेटा देणारा नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. हो मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये एक वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची वैधता मिळते. अनलिमिटेड कॉलिंग सह वर्षभरासाठी इंटरनेट देखील दिले जाते. तब्बल 600 GB चा डेटा रोल आउट दिला जातो. यासोबतच 5G इंटरनेट अनलिमिटेड मिळते. डेली डेटा पॅक संपल्यानंतर 40 kbps च्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट दिले जाते.
OTT प्लॅटफॉर्म चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये एक महिन्यासाठी तुम्हाला बीएसएनएल ट्यून देखील मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्मचे बेनिफिट देखील ग्राहकांना दिले जाणार आहेत. रोज 100 SMS मोफत पाठवू शकता. एक महिन्याच्या म्हणजेच 30 दिवसांच्या वैद्यतेसह Eros Now या एंटरटेनमेंट OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन फ्री मध्ये दिले जाते.
कंपनीचा आणखी एक वार्षिक प्लॅन आहे. यामध्ये बीएसएनएल ट्यून संपूर्ण वर्षभरासाठी उपलब्ध आहे. यात रोज 3 GB डेटा देखील मिळतो. याची किंमत 2999 रुपये आहे. ही एक वर्षासाठी भरल्यास संपूर्ण वर्षभर तुम्हाला त्याचा आनंद घेता येणार आहे.
797 रुपयांचा प्लान काय आहे?
797 रुपयांचा प्लॅन जाणून घ्यायचा झाल्यास हा सुद्धा BSNL चा आणखी एक महत्त्वाचा प्लॅन आहे. यामध्ये देखील युजर साठी अनेक महत्त्वाचे फायदे समाविष्ट केले गेले आहेत. 797 रुपयांमध्ये 300 दिवसांची वैधता दिली जाते. यामध्ये 60 दिवसांसाठी व्हॉइस कॉल अनलिमिटेड दिला जातो आणि 2 GB 4G डेटा देखील उपलब्ध करून दिला जातो.
इतर कंपन्यांनी रिचार्ज प्लान चे रेट जवळपास 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढवले असताना देखील बीएसएनएल कंपनीने अगदी कमी पैशांमध्ये जास्त बेनिफिट देणारे प्लॅन बाजारात आणले आहेत. यामुळे अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात बीएसएनएल कंपनीकडे वळताना दिसत आहेत. तुम्ही देखील या प्लॅनचा लाभ घेऊ शकता यासंबंधीत अधिक माहितीसाठी बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण वाचा » खरंच 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार का? ही आहे शेवटची तारीख
हे पण वाचा » आता ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना मिळणार 101000/- रुपये; जाणून घ्या सविस्तर..