शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीबाबत मोठी अपडेट; शासनाने दिली मुदतवाढ!

E-peek pahani mudat vadh: महसूल विभागाने खरीप हंगाम २०२४-२५ साठी पीक पाहणी प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू केली होती. परंतु अवकाळी पाऊस, सततच्या शासकीय सुट्ट्या, वीज पुरवठ्यातील अडचणी, तसेच तांत्रिक समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे त्यांच्या पिकांच्या नोंदणीमध्ये अडथळे आले.

ई-पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी द्वारे पिकांची नोंद करण्यासाठी आता आणखी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात अली होती, परंतु आता २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे, आणि विशेष म्हणजे, आता ही प्रक्रिया इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे.

हे पण वाचा:  कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर 'हे' काम करा..

E-peek pahani extended:

शासनाने दिलेल्या मुदतवाढ निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे. शेतकरी आता २३ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करू शकतात. तसेच तलाठी स्तरावर सुद्धा पीक पाहणीसाठी २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी यांना पीक पाहणी करण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे.

इंटरनेट शिवाय करा इ-पीक पाहणी

नाशिक विभागात १३ सप्टेंबरपर्यंत १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर पीकपाहणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तरीही १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर नोंद बाकी आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी इंटरनेट संबंधित अडचण येत असल्यास त्यांना मदत दिली जाणार आहे.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांनो, वर्षाखेरीस सोयाबीन सह इतर पिकांचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळेल का? कृषी विभाग म्हणतंय...

हे पण वाचा » जमीन धारकांची चिंता मिटली! “ई-मोजणी- २” द्वारे होणार अवघ्या तासाभरात जमीची मोजणी

ई-पीक पाहणी करतेवेळी शेतकऱ्यांना काही समस्या आल्यास, (०२०) २५७१२७१२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, ते वेळेत आणि अडचणीशिवाय ई-पीक पाहणी नोंदवू शकतील.