Pradhanmantri Kisan Mandhan Yojana: भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनांची प्रमुख भूमिका आहे. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. या लेखात आपण या दोन योजनांचा सखोल आढावा घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-KISAN)
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणारी भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम, म्हणजेच 34,000 रुपये, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.
पीएम किसान योजनेचे फायदे:
- शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 3 हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.
- या योजनेच्या पात्रतेसाठी कोणतीही विशेष अट नाही, अर्जदार फक्त शेतकरी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरते.
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता:
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता लवकरच ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. सरकारकडून अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मागील हफ्त्यांचा विचार करता, ऑक्टोबर महिन्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षभरात तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक हातभार मिळण्यास मदत होते.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY)
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर आधारित आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन हे शेती आहे. मात्र, आजही देशात अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे की, विशिष्ट वयापर्यंतच शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करू शकतो.
हे पण वाचा » लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय; शासन निर्णय जारी!
वृद्धापकाळात शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे शेतकऱ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उरत नाही. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार पीएम किसान मानधन योजना राबवत आहे. विशेषत: शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे.
कशी काम करते ही योजना?
18 ते 40 वयोगटातील शेतकरी पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीची रक्कम त्यांनी अर्ज केलेल्या वयाच्या आधारे ठरवली जाते. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या १८ व्या वर्षी पीएम किसान माधन योजनेसाठी अर्ज केला. अशा परिस्थितीत त्याला या योजनेत दरमहा ५५ रुपये गुंतवावे लागतात. तो ६० वर्षांचा होईपर्यंत त्याला दरमहा ५५ रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या ६० नंतर त्या शेतकऱ्याला दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळेल.
योजनेसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ देशातील फक्त लहान आणि अत्यल्प शेतकरीच घेऊ शकतात. या योजनेचा लाभ 2 हेक्टरपेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जातो. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे..
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- पत्रव्यवहाराचा पत्ता
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा » पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. येथे आपण दोन्ही पद्धती जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करू शकता.
1. ऑनलाइन पद्धत:
- या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://maandhan.in/ वर जावे लागेल.
- वेबसाइटवर जा आणि सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा.
- यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP द्वारे तुमची नोंदणी पूर्ण करा.
- यानंतर, ऑनलाइन फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता
2. ऑफलाइन पद्धत:
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या जनसेवा केंद्रात जावे लागेल.
- तेथे जाऊन या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता.
- याशिवाय त्यांना योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रेही द्यावी लागणार आहेत.
- जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील आणि योजनेच्या अटींची पूर्तता केली असेल तर ऑपरेटर तुमची या योजनेत नोंदणी करेल.
- आणि मग प्रीमियमची रक्कम तुमच्या खात्यातून दर महिन्याला कट केली जाईल.