आता ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना मिळणार 101000/- रुपये; जाणून घ्या सविस्तर..

Lek Ladki Yojana Maharashtra: राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू असून, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना पैसे देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना 3000/- हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. पण राज्यातील मुलींना तब्बल 75000/- रुपयांची आर्थिक मदत देणारी “लेक लाडकी” योजना अनेकांना माहिती नाही.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना अर्थसाह्य दिले जाते. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. नेमकी ही योजना काय आहे? या योजनेच्या लाभासाठी अटी काय आहेत? कागदपत्र कोणती लागणार आहेत? अर्ज कसा करायचा आहे? यासंबंधीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया..

लेक लाडकी योजना काय आहे?

मुलींच्या जन्मासाठी प्रोत्साहन देणे, मुलींच्या जन्माचा दर वाढवणे, मुलींना योग्य शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे, मुलींचा मृत्यू दर देखील कमी करणे, बालविवाह होण्यापासून प्रतिबंध करणे, कुपोषण तसेच अशिक्षित मुलींचे प्रमाण कमी करणे, खरंतर ते शून्यावर आणण्यासाठी सरकारमार्फत अनेक योजना राबविल्या जातात.

हे पण वाचा:  लाडकी बहीणचा फॉर्म Village/ Ward लेव्हलला पेंडिंग दाखवतंय? पुढे पैसे मिळणार की नाही?

राज्य सरकारकडून 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंब पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारक आहेत अशा कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मानंतर 5000/- रुपये, इयत्ता पहिलीत 6000/- रुपये, सहावीत गेल्यावर 7000/- रुपये आणि अकरावीत गेल्यावर 8000/- रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना 75000/- रुपये याप्रमाणे एकूण 101000/- रुपये एवढी रक्कम सरकार मार्फत मदत म्हणून देऊ केली जाते.

लेक लाडकी योजनेची आवश्यक पात्रता

केशरी किंवा पिवळे रेशन कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबांमधील दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्म घेणाऱ्या एक किंवा दोन मुलींना ही योजना लागू राहणार आहे. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीला ही योजना लागू राहणार आहे. पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता-पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!

जुळे मूल जन्माला आले तर..

प्रसूतीच्या वेळी जर जुळे आपत्य जन्माला आले तर एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पण त्यानंतर त्या मातापित्याने कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी कुटुंब असणे आवश्यक आहे. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यांमध्ये बँक शाखेत असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:  'लाडकी बहीण' प्रमाणे सरकारच्या 'या' 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!

लेक लाडकी योजनेची कागदपत्रे:

  • लाभार्थीच्या जन्माचा दाखला
  • कुटंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र (१ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
  • लाभ घेणाऱ्या पालकांचे आधार कार्ड
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी रेशन कार्डची छायांकित प्रत)
  • मतदार ओळखपत्र
  • संबंदित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र
  • शेवटच्या लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

हे पण वाचा » आता ‘लाडकी बहीण’ नंतर केंद्र सरकारने आणली ‘ही’ योजना; महिलांना मिळणार 5 लाख रुपये

हे पण वाचा » खरंच 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार का? ही आहे शेवटची तारीख