तुमच्या एरियात BSNL ची रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वी असे करा चेक.. | How can I check BSNL 4G in my area

How can I check BSNL 4G in my area: दूरसंचार क्षेत्रात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने मोठी प्रगती केली आहे. बीएसएनएलने देशभरात ५०,००० नवीन 4G टॉवर्स बसवले असून, त्यापैकी ४१,००० टॉवर्स आता कार्यरत झाले आहेत. या टॉवर्सच्या माध्यमातून बीएसएनएलने दुर्गम भागांत जलद इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे.

BSNL ची वाढती लोकप्रियता

बीएसएनएलच्या या कार्यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना चांगला धक्का बसला आहे. सध्या, भारतातील ९५% ठिकाणी बीएसएनएलचे नेटवर्क पोहोचले आहे, आणि कंपनीने उर्वरित दुर्गम भागांमध्ये सेवा पोहोचवण्यावर जोर दिला आहे. पुढील वर्षाच्या जूनपर्यंत एक लाख 4G टॉवर्स बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे दूरसंचार सेवा अधिक मजबूत होईल.

हे पण वाचा:  BSNL दिवाळी धमाका ऑफर! रीचार्ज प्लॅनमध्ये घसघशीत सूट; ५०० TV चॅनेल पहा मोफत | BSNL Diwali offer 2024 list

गेल्या काही महिन्यात, खाजगी कंपन्यांनी रिचार्ज दर वाढवल्याने बीएसएनएलने ५.५ दशलक्ष नवीन ग्राहक मिळवले आहेत, तर Jio ने सुमारे ४ दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. BSNL लवकरच 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना सुपर फास्ट इंटरनेट सेवा मिळणार आहे.

ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना

बीएसएनएलने आपल्या रिचार्ज प्लॅन्सचा दर कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना स्वस्तात सेवा मिळू शकणार आहेत. बीएसएनएलने, ग्राहकांची वाढ ही त्यांचे प्रथम प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले असून दर्जेदार सेवा देण्यावर भर दिला आहे.

हे पण वाचा:  लाडकी बहीण योजना, 'या' तारखेला खात्यात जमा होईल ३रा हप्ता?

BSNL चे नेटवर्क आहे की नाही कसे तपासायचे?

तुमच्या घरात किंवा परिसरात बीएसएनएलची 4G सेवा आहे का, हे तपासणे आता अगदी सोपे झाले आहे. ओपनसिग्नल अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागातील विविध टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क तपासू शकता. हे अॅप तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ, स्पीड आणि लेटेन्सी याबाबत सविस्तर माहिती देते.

ओपनसिग्नल अॅप वापरण्याची पद्धत:

  1. प्ले स्टोअर वरुण Open Signal App डाउनलोड करा.
  2. अॅप सेटअप करा.
  3. बीएसएनएलचा सिग्नल तपासण्यासाठी, होम स्क्रीनवरील पिनच्या बाणावर टॅप करा.
  4. वरच्या मेनूमध्ये बीएसएनएल निवडा आणि ‘टाईप’ कॉलममधून 4G निवडा.
  5. नकाशावर हिरवे बिंदू चांगले सिग्नल आणि लाल बिंदू कमकुवत सिग्नल दर्शवतील.
हे पण वाचा:  आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट! लगेचंच करा ‘हे’ काम, नाहीतर… | Aadhaar card big update

भविष्यात, बीएसएनएलच्या 5G सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना आणखी उत्तम फास्ट इंटरनेट सुविधा मिळेल.