How to Apply for Marriage Certificate in Maharashtra: भारत देशामध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये विवाहाचे अनेक प्रकार पडतात. जसे की, पारंपरिक पद्धतीने केलेला विवाह, नोंदणीकृत पद्धतीने केलेला. विवाह कोणताही असो त्याची कायदेशीर नोंद करणे खूप महत्त्वाचे आहे. पारंपारिक पद्धतीने केलेल्या विवाहाची नोंद त्या जोडप्याने लग्नानंतर करून घेणे बंधनकारक आहे. विशेष विवाह कायदा- 1954 आणि हिंदू विवाह कायदा- 1955 या अंतर्गत लग्नाची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? महाराष्ट्रात विवाह नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने कशी करायची? आणि विवाह प्रमाणपत्राचे फायदे कोणकोणते आहेत? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर नक्की करा.
विवाह नोंदणी साठी आवश्यक पात्रता
कोणत्याही पद्धतीने विवाह झालेला असल्यास त्यासाठी काही महत्त्वाची पात्रता असणे आवश्यक आहे. विवाह कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये विवाहाचे प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास त्या जोडप्याला काही अटी व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासंबंधीची अधिक माहिती पुढील प्रमाणे..
- महाराष्ट्र राज्यामध्ये विवाहाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी व विवाहाची नोंद करण्यासाठी वधू किंवा वर हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी नागरिक असणे आवश्यक आहे.
- लग्नाची नोंदणी करण्यासाठी विशिष्ट वयाची पूर्तता करणे जोडप्याला बंधनकारक आहे. जसे की वराचे वय 21 वर्षे किंवा त्यापुढे असावे आणि वधूचे वय 18 वर्षे किंवा त्यापुढे असावे.
विवाह नोंदणी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
विवाह कायद्यानुसार जोडप्याकडे लग्नाची नोंदणी करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र असावेत. त्या संबंधित अधिक माहिती आपण पुढे जाणून घेऊ..
- लग्नाची नोंदणी करताना अर्जाचा फॉर्म भरून द्यावा लागेल.
- लग्नाची तारीख, लग्नाचे ठिकाण, विवाहाची स्थिती आणि राष्ट्रीयत्व काय आहे याची तपशीलवार माहिती असलेले प्रतिज्ञापत्र वर आणि वधू यांना सादर करणे आवश्यक आहे.
- वर, वधूचा पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.
- लग्नाची निमंत्रण पत्रिका असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक पद्धतीने लग्न झालेले असल्यास लग्नातील वर आणि वधूचा विवाहाचा फोटो असावा.
- अर्जदाराचा रहिवासी दाखला असावा.
- वराचा आणि वधूचा जन्माचा दाखला असावा.
- वर आणि वधूचा वयाचा पुरावा असावा.
- धर्मिक स्थळावर विवाह केला असल्यास त्याचा पुरावा असावा.
- लग्नासाठी दोन साक्षीदार आणि त्यांची माहिती असावी.
- भारतीय व्यक्तीने परदेशात लग्न केलं असेल तर दूतावासाकडून त्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
- अर्जदार विधुर/विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्राची प्रत किंवा घटस्फोटीत असेल तर घटस्पोट झाल्याची व्हेरिफाइड कॉपी आवश्यक असणार आहे.
महाराष्ट्रात ऑफलाइन विवाह नोंदणी कशी करावी?
ऑफलाइन पद्धतीने विवाहाची नोंदणी कशी करावी, त्या संबंधित अधिक सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊ..
- ऑफलाइन पद्धतीने लग्नाची नोंदणी करायची असल्यास जोडप्याला सब रजिस्टरच्या ऑफिसमध्ये जावे लागणार आहे.
- त्या ठिकाणी तुम्हाला विवाह नोंदणीचा फॉर्म दिला जाईल.
- या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती जसे की नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे भरावे लागेल.
- वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावे लागतील.
- मग हा फॉर्म सब रजिस्टरच्या ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.
- अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल.
- त्यावर तुम्ही दिलेल्या अर्जाची नोंदणी प्रक्रिया कुठे पर्यंत पोहोचली आहे याची माहिती पाहू शकता.
- रजिस्टर करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विवाहाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रात ऑनलाइन विवाह नोंदणी कशी करावी?
ऑनलाइन पद्धतीने विवाहाची नोंद कशी करावी, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊ..
- विवाहाची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर त्याच्या होम पेजवर तुम्हाला लग्नाची नोंदणी करण्यासाठी Apply Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर विवाह नोंदणीचा फॉर्म ओपन होईल.
- त्यामध्ये जी माहिती विचारण्यात आली आहे ती आवश्यक माहिती नमूद करावी लागेल.
- त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इत्यादी माहिती मागितली जाईल.
- ही सर्व माहिती नमूद केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी वेबसाईटवर अपलोड करावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करावे.
- अशा पद्धतीने विवाह नोंदणी तुम्ही करू शकाल.
विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे फायदे
आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने विवाहाची नोंदणी कशी करायची या संबंधात सविस्तर माहिती जाणून घेतली आहेच. पण, विवाह प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचा कुठे कुठे फायदा/ वापर होतो? त्या संबंधित महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ..
- तुमचे विवाह झाले आहे याचा सबळ पुरावा म्हणून विवाह प्रमाणपत्राचा उपयोग होतो.
- ते अधिकृत कागदपत्र म्हणून तुम्ही वापरू शकता.
- विवाह प्रमाणपत्रांमध्ये वयाचा उल्लेख प्रामुख्याने केला असल्यामुळे कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्ही लग्नाचे सर्व नियम पाळले असल्याचे दाखवून देऊ शकता.
- विवाह नोंदणी केल्यामुळे बालविवाह रोखण्यास मदत होते.
- हे प्रमाणपत्र असल्यास विधवा महिलांना त्यांचा कायदेशीर वारसा हक्क मागता येतो.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पुनर्विवाह रोखण्यासाठी सबळ पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
- हे प्रमाणपत्र असल्यास मुलांच्या कस्टडीसाठी महिलांना सबळ पुरावा म्हणून मदत करते.
- इमिग्रेशन किंवा पासपोर्ट आणि व्हिजा साठी विवाह प्रमाणपत्र अतिशय उपयोगी ठरते.
यासोबतच विवाह प्रमाणपत्राचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याने आपल्या विवाहाची नोंद करून त्याचे विवाह प्रमाणपत्र तयार करून घेणे काळाची गरज आहे.
हे पण वाचा » शासनाचा मोठा निर्णय, आता महिलांना मिळणार 4500/- रुपये; लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ!
हे पण वाचा » ‘या’ उपक्रमाद्वारे राज्य सरकार तरुणांना देणार 10,000/- रुपये प्रति महिना; जाणून घ्या..