पावसाने नुकसान झालंय? मग ‘अशी’ करा विमा कंपनीला तक्रार, मिळेल नुकसान भरपाई!

How to Register Crop Insurance Complaint: महाराष्ट्र राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांची अगदी दानादान उडालेली आहे. मराठवाडा आणि विदर्भासह हजारो हेक्टर शेती क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि फळबागांचे नुकसान झालं आहे. संपूर्ण जीवनमान विस्कळीत झालेला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अंतर्गत खरीप हंगाम 2024-25 साठी नोंदणी केलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना सतत झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे तक्रार 72 तासांच्या आत विमा कंपनी (Crop Insurance Company) ला कळवणं बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या पीक नुकसानीची तक्रार कशी करायची याची माहिती नसल्यामुळे पिक विमा परतावा मिळण्यास अडचणी निर्माण होतात.

पीक नुकसानीची तक्रार विमा कंपनीला कशी करायची? विमा कंपनीला ऑनलाईन अर्ज कसा पाठवायचा? याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना ही पोस्ट नक्की शेअर करा.

हे पण वाचा:  90 दिवसांसाठी सोयाबीनला किमान 4892/- रुपये हमीभावाने खरेदी मिळणार!

पिक विमा कंपनीला नुकसानीची तक्रार कशी करावी?

  • शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला कशी करायची त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुढे दिलेल्या स्टेप फॉलो करा.
  • सर्वात आधी प्ले स्टोअर वरून “क्रॉप इन्शुरन्स” नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करावे.
  • त्यानंतर “कंटिन्यू अॅज गेस्ट” हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतर “पीक नुकसान” या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर “पीक नुकसानीची पूर्वसूचना” या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तो मोबाईल नंबर प्रविष्ट करावा.
  • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो ओटीपी प्रविष्ट करावा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर वर्ष निवडण्यात खरीप हंगाम वर्ष-2024 निवडावे.
  • त्यानंतर आपले राज्य निवडावे.
  • नोंदणी केल्याचा स्त्रोत CSC निवडावा.
  • यामध्ये पावती क्रमांक म्हणजेच पॉलिसी नंबर प्रविष्ट करावा.
  • ज्या गट क्रमांक मधील पिकांचे नुकसान झालेले आहे त्याची तक्रार तुम्हाला नोंदवायची असेल तर किंवा स्वतंत्र तक्रार नोंदवायची असेल तर तसे निवडा.
  • नुकसान झाल्याचे कारण काय आहे याचा तपशील भरावा.
  • त्याबरोबरच नुकसान झालेल्या पिकांचा फोटो काढून “सबमिट” या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमची तक्रार यशस्वीरित्या नोंदवली जाईल.
  • तशी खात्री देणारा मेसेज देखील तुम्हाला मिळेल “डॉकेट आयडी” तुमच्याकडे जपून ठेवावा.
  • मंजूरी नंतर तुम्हाला विमा परतावा मिळेल.
हे पण वाचा:  पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..

प्रधानमंत्री पिक विमा योजना वेबसाईट वरून तक्रार कशी करावी?

शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार करू शकतात. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ती तक्रार नोंदवावी लागेल. यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

  • सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • त्यानंतर “रिपोर्ट क्रॉप लॉस” या बटनावर क्लिक करावे.
  • ज्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही पिक विमा काढला आहे त्या कंपनीचे नाव निवडावे.
  • त्यात विचारला गेलेला सर्व तपशील भरावा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला तक्रार दाखल केल्याचा मेसेज मिळेल.
  • त्यामध्ये असणारा नंबर सेव्ह करून ठेवावा.

पीक नुकसानीची तक्रार कृषी विभागाकडे कशी करावी?

पीक नुकसानीची तक्रार कृषी विभागाकडे देखील करता येऊ शकते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा देखील जमीनदोस्त झालेल्या आहेत. सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून केलेला खर्च परत मिळणे देखील कठीण बनले आहे.

हे पण वाचा:  कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर 'हे' काम करा..

या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाकडे त्यांनी तक्रार करावी. ही तक्रार करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर देखील देण्यात आला आहे. तुमच्या पीक नुकसानीची तक्रार कृषी विभागाला तुम्ही टोल फ्री क्रमांक 14447 वर करू शकता.

या क्रमांकावरून शेतकऱ्यांनी कॉल केला असता त्यांची नुकसानीची तक्रार दाखल केली जाते. वर दिलेल्या तीन पैकी कोणत्याही मार्गाने तुमच्या पीक नुकसानीची तक्रार नोंदवणे शक्य होऊ शकते.

हे पण वाचा » शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, केंद्र सरकारने दिली “डिजिटल कृषी मिशन” ला मंजुरी; जाणून घ्या सविस्तर..

हे पण वाचा » शासनाचा मोठा निर्णय, आता महिलांना मिळणार 4500/- रुपये; लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ!