‘लाडकी बहीण’ डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितले..! | Ladki bahin december payment

Ladki bahin december payment: महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने “माझी लाडकी बहीण” योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत सव्वा दोन कोटिंहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. महिलांना त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करता येतील.

योजनेला आचारसंहितेचा ब्रेक

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महिला व बालविकास विभागाने या योजनेचे हफ्ते तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता सुरु झाल्यामुळे जवळपास 10 लाख महिला नोव्हेंबरच्या हफ्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकते.

हे पण वाचा:  'हा' फॉर्म भरला नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येणार नाहीत

डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री म्हणतात..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केले होते. त्यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही. सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना जोडे दाखवा.” शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आणि महिलांना आश्वासन दिले की, डिसेंबरचा हफ्ता आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल.

हे पण वाचा:  सरकारची "महिला सन्मान बचत प्रमाणपत्र" योजना, 2 वर्षे पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा!

निवडणुकीनंतर योजना सुरू राहणार का?

येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे, तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यातच या योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. या योजनेने महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे, परंतु सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा:  78 हजारांपर्यंत सबसिडी, 300 युनिटपर्यंत मोफत वीज; पहा "पीएम सूर्य घर योजना" काय आहे?

हे पण वाचा » दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव ‘इतका’ झाला!

हे पण वाचा » मोदी सरकारची मोठी भेट; आता मुद्रा योजनेतून 20 लाखांचे कर्ज! वाचा सविस्तर..