ladki Bahini Yojana December installment: राज्यात गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी “लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, आता प्रश्न उपस्थित झाला आहे की डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आचारसंहितेबाबतही स्पष्टता दिली. त्यांनी सांगितले की, “आमचा हेतू स्पष्ट आहे; आम्ही घेणारे नाही तर देणारे लोक आहोत.” यामुळे त्यांनी विरोधकांवर एक टोला लगावत, लाडकी बहिण योजनेत आडथळा आणणाऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या “जोड़ी”ची आठवण करून दिली.
आर्थिक तरतूद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या योजनेवर लक्ष ठेवून ती सुरू ठेवण्याची आश्वास दिली आहेत. त्यांनी सांगितले की, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद केली आहे, आणि पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाल्यास 45 हजार कोटींची तरतूद कण्यात येईल.
डिसेंबरचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना लखपती बनवण्याचे स्वप्न देखील व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर, म्हणजेच 23 नोव्हेंबरच्या दरम्यान, डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल.