Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभरात अतिशय प्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील करोडो महिलांनी अर्ज भरले आहेत. काहींचे अर्ज मंजूर होऊन त्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण देखील झाले आहे. तर काही महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अर्ज केले असून त्यांना अजून पहिल्या हप्त्याचे वितरण होणे बाकी आहे.
या योजनेअंतर्गत केलेला अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ही नक्कीच काळजी करण्याची बाब आहे. पण आम्ही जो पर्याय तुम्हाला सांगणार आहोत त्याचा अवलंब करून निश्चित प्रकारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करून घेऊ शकता. आता हा नेमका पर्याय काय आहे आणि तो कसा करायचा यासंबंधीची माहिती आपण पुढे या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करून घ्या
बहुतांश वेळेला राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांच्याकडून कोणत्याही योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी डीबीटी (DBT) पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर (Direct Bank Transfer) या पद्धतीने पैसे पाठवले असल्यास ते थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतात.
जेव्हा हे पैसे पाठवले जातात त्यावेळी लाभार्थ्याचे जे बँक खाते NPCI सीडिंग असते त्याच खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. पण बऱ्याच वेळी लाभार्थ्याचे एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचे आधार कार्ड लिंक झालेले नसते. म्हणून हे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अडथळे निर्माण होतात.
बँकेमध्ये NPCI फॉर्म भरून द्यायचा आहे
कोणत्याही बँक खात्याला NPCI द्वारे आधार कार्ड लिंक केले जाऊ शकते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे देखील जमा होत असतात. सध्याच्या लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरीही या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसतील तर तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे.
जर ते लिंक केलेले नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन NPCI फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक केले जाते आणि त्यानंतर शासनाकडून पाठवले जाणारे पुढील हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतात. त्यामुळे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
NPCI फॉर्म द्वारे आधार कार्ड बँक खात्याला लिंक कसे करावे?
- तुम्हाला NPCI फॉर्म ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे.
- फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवने आवश्यक आहे.
- फॉर्मवर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, बँक शाखा, तुमचा खाते क्रमांक, खातेदाराचे नाव लिहून सही सुद्धा करायची आहे.
- तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स NPCI फॉर्मसोबत जोडायची आहे.
- हा फॉर्म तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जमा करायचा आहे.
- ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.