ऐन दिवळीत गॅस सिलिंडरच्या दरात वाढ! पहा ताजे भाव | LPG gas cylinder rate hike

LPG gas cylinder rate hike: 1 नोव्हेंबरपासून देशभरात नागरिकांना मोठा धक्का बसला आहे, कारण तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर साधारण 62 रुपयांनी महागले आहेत. दिवाळीच्या उत्सवाच्या काळात या दरवाढीने नागरिकांचे बजेट हलण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे ताजे दर

वाढीच्या ताज्या दरानुसार, खालीलप्रमाणे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे:

  • दिल्ली: 1802 रुपये
  • कोलकाता: 1911.50 रुपये
  • मुंबई: 1754.50 रुपये
  • चेन्नई: 1964.50 रुपये
हे पण वाचा:  Jio ची दिवाळी निमित्त खास ऑफर! 699 रुपयांत 4G फोन, ज्यात live टीव्ही, चित्रपट, इंटरनेट सह अनेक सुविधा..

दुसरीकडे, तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे याठिकाणी नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली: 803 रुपये
  • कोलकाता: 829 रुपये
  • मुंबई: 802.50 रुपये
  • चेन्नई: 818.50 रुपये

विमानप्रवासाच्या किमतीत वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यासोबतच, विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी विमानात वापरण्यात येणाऱ्या ATF (एवियेशन टर्बाइन फ्युएल) इंधनाच्या किमतीत 3000 रुपये प्रति किलोची वाढ केली आहे. यामुळे, दिवाळीच्या काळात विमानप्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसू शकतो.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, केंद्र सरकारने दिली "डिजिटल कृषी मिशन" ला मंजुरी; जाणून घ्या सविस्तर..