Magel tyala saur krushi pump yojana online registration: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक दशकांपासून कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. या उशीरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वीजपुरवठ्यात व्यत्यय येत होता आणि शेतीच्या उत्पादनावर त्याचे परिणाम होत होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना त्यांची मागणी केल्यानंतर लगेचच सौर ऊर्जेवर (Solar pump) चालणारे कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत.
चार लाख रुपयांचा सौरपंप मोफत!
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी गावातील शेतकरी योगीनाथ पाटणे यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योगीनाथ पाटणे यांना त्यांच्या पाच एकर शेतीसाठी सौर पंप मिळाल्याने त्यांचे वीज बिलात तब्बल दोन लाख रुपयांची बचत झाली आहे.
योगीनाथ पाटणे सांगतात, “या योजनेअंतर्गत बसवण्यात आलेला सौर कृषी पंप दिवसा अखंडित वीजपुरवठा देतो. त्यामुळे पिकांना नियमित पाणी पुरवठा करता येत. ज्यामुळे पिकांच्या उत्पादनात सुधारणा झाली आहे. एका वर्षाच्या आत वीज बिलात जवळजवळ दोन लाख रुपयांची बचत झाली आहे.
साधारणतः एका सौर कृषी पंपाची किंमत 4 लाख रुपयांपर्यंत येते. परंतु ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’अंतर्गत योगीनाथ पाटणे यांना हा पंप मोफत मिळाला. त्यासाठी त्यांना केवळ पन्नास हजार रुपये खर्च करावे लागले. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्चात ऊर्जा मिळवून देणे हा आहे.
मागेल त्याला सौर कृषि पंप साठी अर्ज प्रक्रिया
सौर कृषीपंप नविन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. इच्छुक शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
महावितरण पोर्टलवर लॉगिन
सर्वप्रथम महावितरण पोर्टल वर लॉगिन करा. नंतर “सौर कृषीपंप वीज जोडणी अर्ज” विभागात जा.
1. आवश्यक माहिती भरा
- प्रलंबित अर्जदारांसाठी (ज्यांनी नविन वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत):
अशा अर्जदारांना फक्त अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि पंप क्षमतेची मागणी यासारखी आवश्यक फील्ड भरावी लागेल. - नवीन अर्जदारांसाठी (ज्यांनी पैसे भरले नाहीत):
या अर्जदारांसाठी सर्व फील्ड अनिवार्य असतील. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा लागेल.
2. ए-1 फॉर्म आणि कागदपत्रांची पूर्तता
अर्ज करताना अर्जदाराने खालील कागदपत्रांसह ए-1 फॉर्म भरावा:
- ७/१२ उतारा प्रत
- आधार कार्ड
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र अर्जदाराने या फॉर्मवर आणि घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
3. सर्वेक्षण आणि डिमांड नोट
अर्ज केल्यानंतर 10 दिवसांच्या आत फील्ड ऑफिसकडून सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षणात काही विसंगती असल्यास, अर्जदारास त्याची माहिती दिली जाईल. सर्व काही योग्य आढळल्यास डिमांड नोट जारी केली जाईल.
4. डिमांड नोट देय झाल्यानंतर
अर्जदाराने डिमांड नोट प्राप्त केल्यानंतर त्यानुसार पेमेंट पूर्ण करावे. लाभार्थ्यांनी आवश्यक असल्यास एजन्सीचे नावही सादर करावे. अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर अर्जाची प्रगती एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
अर्जदार पात्रता निकष
सदर योजनेसाठी अर्जदार पात्र ठरण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत. हे निकष खालीलप्रमाणे आहेत:
- अर्जदाराचे जलस्त्रोत उपलब्ध असणे
अर्जदाराच्या शेतात शाश्वत जलस्त्रोत असणे आवश्यक आहे. - शेतजमिनीचा आकार व सौर कृषीपंपाची क्षमता
- ५ एकरपर्यंत जमिनी असणाऱ्यांसाठी ३ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप दिल जाईल.
- ५ एकरांपेक्षा जास्त जमिनी असणाऱ्यांसाठी ५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
- इतर पात्रता निकष
- पारंपरिक ऊर्जा पुरवठा नसलेले शेतकरी.
- वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी विद्युतीकरण न होणारे शेतकरी.
- राज्यातील अतिदुर्गम भागातील शेतकरी.
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी/विहीर/बोअरवेल यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी यासाठी पात्र असतील.
- लाभार्थी हिस्सा
- सर्वसाधारण गटासाठी १०% हिस्सा आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी ५% हिस्सा आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत अर्जदाराने अटल सोलर योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा.
अर्जदारांसाठी विशेष सूचना
सौर कृषीपंप जोडणी प्रक्रियेत लाभार्थी शेतकऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करून अर्ज करावा. कोणत्याही प्रकारची विसंगती किंवा माहितीची कमतरता आढळल्यास महावितरण कार्यालयात संपर्क साधावा.
हे पण वाचा » Jio ची दिवाळी निमित्त खास ऑफर! 699 रुपयांत 4G फोन, ज्यात live टीव्ही, चित्रपट, इंटरनेट सह अनेक सुविधा..
हे पण वाचा » मोदी सरकारची मोठी भेट; आता मुद्रा योजनेतून 20 लाखांचे कर्ज! वाचा सविस्तर..