‘लाडकी बहीण’ प्रमाणे सरकारच्या ‘या’ 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!

Maharashtra Government Schemes: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500/- रुपये दिले जात आहेत. ही योजना संपूर्ण राज्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. अनेक महिला आज सुद्धा या योजनेसाठी अर्ज भरत आहेत. राज्यातील तरुणी, महिला वर्गाला याचा मोठा फायदा होत असताना दिसत आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना उत्पन्नाची अट घालून देण्यात आलेली आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणे 3 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरली असली तरीही राज्य सरकारकडून या व्यतिरिक्त आणखी चार योजना राबवल्या जात आहेत. ज्या योजनेअंतर्गत 1500/- रुपये प्रति महिना दिला जातो. त्या योजना कोणकोणत्या आहेत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना, सहकार्यांना नक्की शेअर करा.

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत विधवा, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या महिलांना अनुदान दिले जाते. समाजातील दुर्बल आणि असहाय्य घटकांना या योजनेअंतर्गत 1500/- रुपयांचा लाभ दिला जातो.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनाथ, परित्यकता, दिव्यांग, विधवा, दुर्धर आजार ग्रस्त, देवदासी, अत्याचारित महिला, तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला तसेच 35 वर्षांपुढील अविवाहित निराधार स्त्रीला या योजनेमध्ये समाविष्ट करून आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो.

हे पण वाचा:  मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना मोठी भेट! आता प्रत्येकाचे होणार स्वतःचे घर; पहा काय आहे योजना..

त्यासाठी पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आणि पात्रता असणे आवश्यक आहे.

योजनेची आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज.
  • अर्जदाराच्या वयाचा दाखला.
  • अर्जदार किमान 18 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किमान 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • विधवा अर्जदार महिला असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला असावा.
  • दिव्यांग अर्जदार असल्यास शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्त्वाचा दाखला (किमान 40%) असणे आवश्यक आहे.
  • अनाथ उमेदवार असल्यास संबंधित यंत्रणेकडून त्याचा दाखला दिलेला असावा.
  • दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र असावे.
  • संबंधित यंत्रणेचा उत्पन्नाचा दाखला असावा.
  • दिव्यांग अर्जदाराचे कमाल वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये असल्याचा दाखला.
  • अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँकेच्या पासबुकची साक्षांकित प्रत, रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज करू शकता.

2. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

राज्यातील वंचित आणि निराधार वृद्ध नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी किंवा त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून श्रावण बाळ योजना राबविण्यात येते. वृद्धापकाळमध्ये मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वृद्ध नागरिकांना कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता लागणार नाही या उद्देशाने ही योजना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

हे पण वाचा:  लाडक्या बहिणींना कधी मिळणार २१०० रुपये? सरकारने स्पष्टच सांगितले..!

योजनेची आवश्यक कागदपत्रे

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती त्या संबंधित माहिती जाणून घेऊ..

  • अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, अर्जदाराचा रहिवासी दाखला, अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • अर्जदाराचे कमाल वार्षिक उत्पन्न (मर्यादा 21 हजार रुपये) असल्याचा उत्पन्नाचा दाखला.
  • दारिद्र्यरेषेखाली असलेले किंवा नसलेले नागरिक यासाठी अर्ज करू शकतात.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्यावी किंवा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावे. या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यास प्रति महिना नियमाप्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो.

3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी सरकारकडून इंदिरा गांधी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत समाजातील दुर्बल घटकांसह वृद्ध नागरिकांना आधार देण्याचे काम केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारकडून निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन केली जाते. ही योजना 65 वर्षांपेक्षा पुढे वय असलेल्या निराधार वृद्ध नागरिकांसाठी आहे.

योजनेची आवश्यक कागदपत्रे

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्र आवश्यक आहे.

  • यासाठी अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची किमान वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे दारिद्र्य रेषेचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला आणि पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहेत.
हे पण वाचा:  2024 सोलर पंप योजनेची यादी आली; असे चेक करा यादीत तुमचे नाव.. | PM Kusum Solar pump new list 2024

या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यास प्रति महिना नियमाप्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो.

4. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

या योजनेचा लाभ 18 ते 79 वयोगटातील 80 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व व बहुअपंगत्व असलेल्या नागरिकांना लाभ देण्यात येतो. अपंग नागरिकांना आर्थिक मदत व्हावी, त्यांचे जीवनमान सुरळीत चालावे यासाठी सरकारकडून ही आर्थिक आर्थिक मदत देऊ केली जाते.

योजनेची आवश्यक कागदपत्रे

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करण्याची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  • अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा अपंगत्वाचा दाखला असावा.
  • अपंग अर्जदाराचा दारिद्र्यरेषेचा दाखला असावा.
  • अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक झेरॉक्स, तसेच रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावर अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा » शासनाचा मोठा निर्णय, आता महिलांना मिळणार 4500/- रुपये; लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ!

हे पण वाचा » आता ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना मिळणार 101000/- रुपये; जाणून घ्या सविस्तर..