आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra: राज्यातील वृद्ध, वयस्कर नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण केलेल्या किंवा त्यावरील नागरिकांना 3000/- रुपयांची थेट आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येते. यासाठी यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 3000/- हजार रुपये ट्रान्सफर केले जातात आणि वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकू कमी येणे, कमी दिसणे आणि चालण्यास अडचण येणे अशा वयस्कर, वृद्ध नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र यांसारखे अनेक उपकरण देखील देण्यात येतात. 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वयोश्री योजनेची घोषणा करण्यात आली होती.

६५ वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत 3 हजार रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे पुरवण्यात येतात यासाठी लागणारी कागदपत्रे, आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि सर्व सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

हे पण वाचा:  पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या.. | Post office saving scheme

वयाची 65 वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक शारीरिक त्रास सुरू होतात. जसे की कमी ऐकू येणे, कमी दिसणे, उठण्या-बसण्यामध्ये समस्या येणे यासाठी वेगवेगळी उपकरण खरेदी करावी लागतात. त्यासाठी पैशांचा अभाव असल्यामुळे या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना सरकारकडून राबविण्यात येत आहे.

राज्यातील 65 वर्षे पूर्ण केलेल्या व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीमध्ये जगण्यासाठी आणि वयोमानानुसार येणाऱ्या अशक्तपणा किंवा अपंगत्व यावर उपाययोजना करण्यासाठी पैशांची गरज भासते किंवा उपयोगी उपकरणे खरेदी करता यावी यासाठी मुख्यमंत्री व यशश्री योजना अंतर्गत अर्थसाह्य दिले जाते.

हे पण वाचा:  लाडकी बहीणचा फॉर्म Village/ Ward लेव्हलला पेंडिंग दाखवतंय? पुढे पैसे मिळणार की नाही?

वृद्ध नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य आबादीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यभरात राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वयोशश्री योजनेअंतर्गत मिळणारे लाभ कोणते?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ३०००/- रुपये रोख आर्थिक मदत लाभार्थ्यांना करण्यात येते. त्याचबरोबर पुढे देण्यात आलेली आवश्यक उपकरण देखील देण्यात येतात. त्याबद्दल जाणून घेऊ..

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • गुडघा ब्रेस
  • श्रवण यंत्र, इ.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र आहेत?

  • मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणते नागरिक पात्र आहेत त्यासंबंधीचा आढावा आपण जाणून घेऊ.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असावा.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी सलग्न केलेले असावे.
  • राज्यातील किमान 30 टक्के महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
हे पण वाचा:  लाडक्या बहिणींना कधी मिळणार २१०० रुपये? सरकारने स्पष्टच सांगितले..!

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जातिचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • स्वत:चे घोषणा प्रमाणपत्र
  • समस्येचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • बँक खाते पासबुक (फोटोकॉपी)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.

हे पण वाचा » कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर ‘हे’ काम करा..

हे पण वाचा » ‘या’ उपक्रमाद्वारे राज्य सरकार तरुणांना देणार 10,000/- रुपये प्रति महिना; जाणून घ्या..