Mahila Samman Savings Certificate Post Office: महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” (MSSC). ही योजना भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना सुरक्षित आणि आकर्षक व्याजदारासह गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ.
‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेचे उद्दीष्ट
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 27 जून 2023 रोजी जारी केलेल्या ई-राजपत्र अधिसूचनेनुसार सर्व सार्वजनिक आणि पात्र खाजगी बँकांमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे मुली आणि महिलांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याचा सरकारचा हेतू आहे. MSSC आता पोस्ट ऑफिस आणि पात्र असणाऱ्या शेड्यूल्ड बँकांमध्येही उपलब्ध आहे, ज्यामुळे महिला सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची वैधता 31 मार्च 2025 पर्यंत फक्त दोन वर्षांसाठी उपलब्ध आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना 7.5% वार्षिक व्याजदर दिला जातो, जो तिमाही चक्रवाढ व्याजासह लागू होतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळते, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.
- आकर्षक व्याजदर: 7.5% वार्षिक व्याज दर तिमाही चक्रवाढी व्याजासह उपलब्ध आहे.
- गुंतवणुकीची मर्यादा: या योजनेत किमान ₹1,000 आणि जास्तीत जास्त ₹2,00,000 ची गुंतवणूक करता येते.
- आंशिक पैसे काढण्याचा पर्याय: महिला त्यांच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त 40% रक्कम मॅच्युरिटीपूर्वी काढू शकतात.
- दोन वर्षांची वैधता: या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना अल्पावधीतच चांगला परतावा मिळतो.
योजनेचे फायदे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांना आर्थिक स्थिरता आणि सुरक्षा प्रदान करते. या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे महिलांना त्यांच्या बचतीसाठी उत्तम पर्याय मिळतो. याशिवाय, 7.5% व्याज दर तिमाही आधारावर दिला जात असल्यामुळे महिलांच्या बचतीत वेगाने वाढ होते. या योजनेत बचत केल्यानंतर गरजेनुसार महिला त्यांच्या खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात. ज्यामुळे महिला त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करू शकतात.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- कोणतीही महिला या योजनेत अर्ज करू शकते
- पालक, अल्पवयीन मुलीसाठीही खाते उघडू शकतात.
- या योजनेत कोणतीही वयोमर्यादा नाही
- कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात.
अर्जदार जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेला भेट देऊन त्यांचा फॉर्म भरू शकतात. फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे करावे लागतात.
हे पण वाचा » 90 दिवसांसाठी सोयाबीनला किमान 4892/- रुपये हमीभावाने खरेदी मिळणार!
आवश्यक कागदपत्रे
अर्ज प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये,
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ओळख व पत्ता पुरावा आवश्यक असतो.
ठेव आणि मॅच्युरिटीवर पेमेंट
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत किमान ₹1,000 आणि जास्तीत जास्त ₹2,00,000 ची गुंतवणूक करता येते. ठेवीची मॅच्युरिटी दोन वर्षांची आहे, आणि त्या कालावधीच्या शेवटी महिलांना व्याजासह त्यांचे पैसे परत मिळतात.
हे पण वाचा » लाडकी बहीणचा फॉर्म Village/ Ward लेव्हलला पेंडिंग दाखवतंय? पुढे पैसे मिळणार की नाही?
या योजनेत महिलांना त्यांच्या जमा रकमेपैकी जास्तीत जास्त 40% रक्कम खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर व मॅच्युरिटीपूर्वी काढण्याची परवानगी आहे. परंतु मॅच्युरिटीपूर्वी एकदाच पैसे काढण्याची परवानगी या योजनेत देण्यात येते. अल्पवयीन मुलींसाठी खाते उघडल्यास, पालक किंवा कायदेशीर पालक हे पैसे काढू शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही महिलांसाठी सुरक्षित, आकर्षक आणि दीर्घकालीन लाभ देणारी योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या बचतीला चांगला परतावा देखील मिळेल. सरकारचा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक महातवाचं पाऊल आहे, ज्यामुळे देशतील प्रत्येक महिला आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन करू शकेल.