PM Vishwakarma Yojana in Marathi: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या योजनेचे लाभार्थी असलेल्या कारागीरांशी संवाद साधला असून, त्यांना प्रमाणपत्रे आणि ऋणपत्रांचे वितरण देखील केले.
काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?
देशातील कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘पीएम विश्वकर्मा’ योजना सुरू केली. या योजनेचे उद्दिष्ट पारंपरिक कामगारांना आणि कारागिरांना आर्थिक स्थैर्य देणे हे आहे. योजनेद्वारे 140 हून अधिक जातींतील लोकांना कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामध्ये 17 हून अधिक प्रकारच्या कारागिरांचा समावेश केला आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा मिळवायचा?
- 140 हून अधिक जातींतील कारागीरांना योजनेचा लाभ घेता येईल.
- फक्त कुशल कारागीर आणि शिल्पकारच या योजनेचा अर्ज करू शकतात.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही कर भरत नसल्यास योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- मोबाईल नंबर
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज प्रक्रिया
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in/ ला भेट द्या.
- नवीन नोंदणीसाठी पर्याय निवडा आणि तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपी प्रविष्ट करा.
- आधार क्रमांकासोबत ऑथेंटिकेशन करा.
- अर्जातील आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर फायनल सबमिट करून अर्ज सादर करा.
हे पण वाचा » ‘या’ तारखेपासून सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले..
हे पण वाचा » महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कधी आणि किती रुपयांनी? जणून घ्या..