Pradhan Mantri Mudra Loan Yojana in Marathi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी उद्योजकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे, ज्यामुळे छोटे-मध्यम उद्योग (SME) वाढवण्याचा विचार करणाऱ्या नवउद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतर्गत कर्ज मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बदलाची घोषणा 23 जुलै 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती, आणि आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत पुरवणे आहे. यामुळे नवउद्योजकांना त्यांचा व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. यातुन रोजगार निर्मितीसुद्धा होण्यास मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत “शिशु”, “किशोर” आणि “तरुण” अशा तीन श्रेणी आधीपासूनच होत्या. आता “तरुण प्लस” नावाची एक नवीन श्रेणी या योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या श्रेण्या:
- शिशु योजना: या अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद आहे.
- किशोर योजना: 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
- तरुण योजना: 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची संधी देते.
- तरुण प्लस योजना: “तरुण” योजनेत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत करणाऱ्या उद्योजकांना या नवीन श्रेणी अंतर्गत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
यामुळे नवउद्योजकांना त्यांच्या उद्योगाची उभारणी व विस्तार करण्यास मदत होईल.
मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील:
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- व्यवसायासाठी आधारभूत आर्थिक मदतीची आवश्यकता असावी.
- आवश्यक कागदपत्रे, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, व बँक खाते पासबुक इ. कागदपत्रे सादर करावी लागतील.
अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. अर्जदार कोणत्याही अधिकृत बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) ला भेट देऊन आपल्या व्यवसायासाठी मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाची मागणी करू शकतो. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर बँकेकडून त्याची सर्व आवश्यक पडताळणी करून प्रक्रिया पुढे सुरू केली जाईल.
परतफेडीचे नियम
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेत परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत असतो. कर्जाची परतफेड मासिक किंवा त्रैमासिक हप्त्यांमध्ये करता येते, ज्यामुळे नवउद्योजकांना परतफेडीसाठी आवश्यक कालावधी मिळतो.
नवउद्योजकांना मिळणारे फायदे
- अधिक निधीची उपलब्धता: 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे उद्योजकांना अधिक निधी मिळू शकेल.
- रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन: अधिक उद्योगधंद्यांची वाढ झाल्यामुळे रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील.
- उत्पादनक्षमतेत वाढ: यामुळे नवउद्योजक त्यांच्या व्यवसायाची गुणवत्ता सुधारू शकतील.
सरकारचा हा निर्णय दिवाळीपूर्वी उद्योजकांसाठी दिलेली एक मोठी भेटच आहे. नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करावा व रोजगार निर्मितीत योगदान द्यावे.
हे पण वाचा » BSNL चा नवा रीचार्ज प्लॅन! 298 रुपयांत मिळणार भरघोस डेटा, वैधता 52 दिवसांची..
हे पण वाचा » महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!