आता रेशनवर धान्य मिळणार समसमान, केंद्र सरकारचा नवीन नियम लागू; जाणून घ्या..

Ration card rule change: भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. देशातील कोट्यवधी लोकांना त्याचा लाभ मिळतो. या मध्ये विशेषतः गरीब आणि गरजू लोकांसाठी बनवलेल्या योजनांचा समावेश आहे. गरिबांसाठी रेशनिंग व्यवस्थेअंतर्गत साखर, तेल, तांदळासह गव्हाचे वाटप केले जाते. कोरोनाच्या काळात सरकारने अतिरिक्त धान्य वितरणाला मंजुरी दिली होती. आता धान्य वाटप संदर्भात काही बदल करण्यात आले आहेत.

1 नोव्हेंबरपासून नियमांमध्ये बदल

1 नोव्हेंबरपासून भारत सरकारने रेशन कार्डधारकांसाठी काही महत्वाचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांच्या अंतर्गत, रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा तांदूळ आणि गव्हाचे वाटप समसमान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा:  रेशन दुकानात तांदूळ बंद! आता मसाल्यासह 'या' ९ गोष्टी मोफत देणार सरकार; योजनेत केला मोठा बदल..

यापूर्वी, 3 किलो तांदळासह 2 किलो गव्हाचे वाटप करण्यात येत होते. आता या नियमानुसार, 2 किलो गव्हाच्या ऐवजी 2.5 किलो आणि 3 किलो तांदळाच्या ऐवजी 2.5 किलोचे वाटप करण्यात येणार आहे.

अंत्योदय कार्डधारकांसाठी बदल

अंत्योदय कार्डधारकांना पूर्वी 14 किलो गव्हासह 30 किलो तांदळाचे वाटप केले जात होते. आता या नियमांतर्गत, त्यांना 18 किलो तांदळासह 17 किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

हे पण वाचा:  महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कधी आणि किती रुपयांनी? जणून घ्या..

ई-केवायसीसाठी मुदतवाढ

याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 1 सप्टेंबर होती, पण अनेक अडचणींमुळे या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.