Mazi Ladki Bahin Yojana New Update: राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभरात सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत दिली जात आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने केलेला एक प्रभावी प्रयत्न आहे.
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामध्ये निकषानुसार पात्र ठरलेल्या महिलांना प्रति महिना 1500/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना स्थैर्य मिळवून देणे, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिलांना दर महिना आर्थिक सहाय्य दिल्यास त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे आणि आर्थिक अडचणी कमी करणे हे देखील या योजने मागचे प्रमुख कारण आहे.
योजनेच्या अर्जाला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ!
विशेषतः ग्रामीण भागामधील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये इतरांवर निर्भर राहावे लागते. तशी वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून या योजनेमार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे. नुकतीच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने या योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये 1 कोटी 59 लाख महिलांना आर्थिक लाभ मिळाला आहे. पात्र महिलांना एकूण 4787 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. या योजनेची महिलांमध्ये मोठी चर्चा असून योजनेमार्फत महिलांना त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यास मदत होणार आहे. आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना दर महिन्या दरमहा 1500/- रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. यासाठी अर्जदार महिलांना अंगणवाडीत सेविकांच्या साह्याने अर्ज भरावा लागतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून महिलांना फक्त आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांना दर महिना आर्थिक मदत नियमितपणे दिली जाणार आहे.
माध्यमांमध्ये नुकतीच एक बातमी व्हायरल झाली होती. ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावाने तब्बल 30 अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. या गैरप्रकारामुळे राज्य सरकारकडून अर्ज मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित व्हावी यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापूर्वी या योजनेमध्ये अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी 11 अधिकृत व्यक्तींवर देण्यात आली होती. ज्यामध्ये बालवाडी सेविका, अशा सेविका, समूह संघटक, ग्रामसेवक, इत्यादींचा समावेश होता.
राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
परंतु आता घेण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार केवळ अंगणवाडी सेविका या अर्जांना मंजुरी देऊ शकतात. हा महत्त्वपूर्ण निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी घेण्यात आला आहे. आता या योजनेसाठी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजुरीची जबाबदारी फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. मनुष्यबळा अभावी अर्ज मंजुरीला वेळ लागू शकतो. यामुळे योजनेच्या पारदर्शकतेत अधिक वाढ होईल आणि अनावश्यक गैरप्रकार देखील टाळता येणार आहेत.
हे पण वाचा » रेशन कार्ड साठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती
हे पण वाचा » शेजारचा शेतकरी तुमचा बांध कोरतोय? मग ‘असा’ शिकवा त्याला कायदेशीर धडा; पुन्हा हिम्मत नाही करणार!