Majhi Ladki bahin Yojana SMS Problem: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या आणि पडताळणी मध्ये पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्याचं शुभारंभ करण्यात अला आहे.
अनेक महिलांना हे पैसे मिळालेले असले तरीही अनेकांना ते मिळालेले नाहीत, अशी तक्रार अनेक महिला अर्जदार करत आहेत. याचे नेमके कारण काय आहे? याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
या महिलांना १ ला हप्ता मिळाला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात करून ३ महिने पूर्ण झाले आहेत. जून आणि जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला 1500/- रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याला पुन्हा मुदतवाढ दिली होती. त्यासाठी 31 ऑगस्ट ही तारीख दिलेली होती.
१ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पूर्वीपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमांमधून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला होता.
म्हणून अनेक महिलांना SMS आले नाहीत
अनेक महिलांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पण बहुतांश महिलांना अजून पैसे जमा झाल्याचे मेसेजेस (SMS) आलेले नाहीत. तर याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकेच्या टेक्निकल सर्वर प्रॉब्लेम मुळे अनेकांना पैसे जमा होऊन देखील मोबाईलवर मेसेज आलेले नाहीत. अशा महिलांनी आपले ऑनलाइन बँक अकाउंट वरील रक्कम तपासून घ्यावी किंवा ट्रांजेक्शन डिटेल्स तपासावे.
पैसे जमा न झाल्याचे ‘हे’ पण कारण असू शकते
जर हे करणे जमत नसेल तर आपल्या बँक शाखेत जाऊन रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये ३०००/- रुपये जमा झालेले आहेत, परंतु बँकेकडून तसा मेसेज त्यांना आला नसल्यामुळे महिला अर्जदार संभ्रमामध्ये आहेत. तर तसा संभ्रम न बाळगता आपल्या बँकेचे खाते एकदा ऑनलाइन किंवा बँक शाखेमध्ये जाऊन तपासून घ्यावे. बहुतांश जणांना असा प्रॉब्लेम आलेला आहे.
…तर बँकेत जाऊन हे काम नक्की करा
या व्यतिरिक्त ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक नाहीत अशा महिलांना पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. त्यांनी एक तर ऑनलाइन पद्धतीने आपले बँक खाते आधार सोबत लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यावे किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन आपल्या अकाउंटला आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर त्यांचा ३०००/- रुपयांचा हप्ता जमा केला जाऊ शकतो.
हे पण वाचा » रेशन दुकानात तांदूळ बंद! आता मसाल्यासह ‘या’ ९ गोष्टी मोफत देणार सरकार; योजनेत केला मोठा बदल..
हे पण वाचा » लाडकी बहीण योजनेचे 3000/- रुपये मिळणार की नाही? असे चेक करा स्टेटस, २ मिनिटांत..