Lakhpati didi Yojana Maharashtra: सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने महिलांसाठी अजून एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचे 1500/- रुपये प्रति महिना अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज पर्यंत दोन महिन्याचे 3000/- हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या देशामध्ये एकूण 7 राज्यांकडून महिला सशक्तीकरणासाठी आर्थिक अनुदान देणाऱ्या योजना सुरू आहेत. त्यामध्ये आता केंद्र सरकारने लखपती दीदी योजना आणली असून या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. यातून महिला सक्षमीकरणासाठी नवी दिशा मिळणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.. ? ही योजना नेमकी कोणासाठी आहे..? यासाठी कोणती आवश्यक पात्रता आहे..? या संबंधित अधिक माहिती आपण या लेखांमध्ये पुढे जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महिलांसाठी केंद्र सरकारच्या नवनवीन योजना
राज्य तसेच केंद्र सरकारने आतापर्यंत महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे. देशामध्ये महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती सुधारावी, त्यामध्ये प्रगती व्हावी, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून लखपती दीदी योजना राबवली जात आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारने या योजनेला मंजुरी दिली असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या उद्देशाने चालू करण्यात आलेली ही योजना महिलांसाठी अतिशय दिशादर्शक ठरणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.
लखपती दीदी योजना काय आहे?
लखपती दीदी योजना बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने चालू करण्यात आली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढीस लागण्यासाठी या योजनेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. गरीब, मध्यमवर्गीय, गरजू महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, सामान्य महिला उद्योजिका व्हावी असा उद्देश या योजनेमागे आहे.
एकूण ३ कोटी महिलांना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उद्योजिका बनविणे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावा. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे लाख अशांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
महिलांच्या उद्योग व्यवसायाला भरारी मिळणार
महिलांना बचत गटामार्फत एखादा उद्योग सुरू करावा लागणार आहे. या उद्योगाचा संपूर्ण आराखडा सरकारला सादर केला जाईल. त्यानंतर उद्योगाच्या आराखड्याची आणि लखपती दीदी योजनेसाठी केलेल्या अर्जाची पडताळणी शासनामार्फत केली जाईल. त्यानंतर सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यास त्या बचत गटातील महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून महिला आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू शकतील आणि आर्थिक सक्षम बनतील.
हे पण वाचा » ‘हा’ फॉर्म भरला नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येणार नाहीत
हे पण वाचा » फ्री मध्ये करा आधार कार्ड अपडेट, 14 सप्टेंबर नंतर लागणार शुल्क; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस