खरंच 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार का? ही आहे शेवटची तारीख

Majhi ladki bahin yojana last date to apply: महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत अग्रस्थानी असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतर याची अर्ज प्रक्रिया थांबणार का? याबद्दल अनेक महिलांना प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ही दिली गेली होती. मात्र सरकारकडून त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले गेले होते.

त्यामुळे 31 ऑगस्ट नंतर अर्जाची मुदत संपणार का आणि जर तसे नसेल तर अर्जाची पुढची शेवटची तारीख कोणती असणार आहे? हा प्रश्न राज्यातील महिलांना पडलेला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारने केल्यानंतर 31 जुलै ही अर्जाची मुदत दिली होती. पण कागदपत्रांसाठी जमवाजमव आणि सरकारी कार्यालयामधील गर्दी पाहता सरकारने या योजनेचा अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिली होती.

हे पण वाचा:  लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले..

महिला व बाल विकास मंत्री म्हणाल्या..

पण त्यानंतर योजनेचे काय होणार याचा संभ्रम सध्या महिलांमध्ये आहे. उद्या 31 ऑगस्ट तारीख असून अर्ज न केलेल्या महिलांना धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता पुढची तारीख कोणती असा प्रश्न महिलांना पडला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत ची नसून या योजनेच्या अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

अजूनही अर्जाची पडताळणी सुरू

त्यामुळे इथून पुढे अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यापुढे महिला कधीही अर्ज करू शकतात. त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यावर पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांना त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिला उमेदवारांसाठी अर्जाची छाननी जिल्हास्तरावर सुरू असून पडताळणी झाल्यावर पात्र असणाऱ्या अर्जदारांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेजेस देखील पाठवण्यात येत आहेत.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!

हा डेटा महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर याची यादी बँकांना पाठवली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेली आहे. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज मंजूर झाले आहेत का याची तपासणी अधिकृत संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे.

नागपुरातील कार्यक्रमातून निधीचे वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्ट पासून पुढे अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना त्यांचे पैसे 31 ऑगस्ट पासून वितरित केले जाणार असल्याची माहिती देखील महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या संबंधित निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

हे पण वाचा:  मोदी सरकारची मोठी भेट; आता मुद्रा योजनेतून 20 लाखांचे कर्ज! वाचा सविस्तर.. | Mudra Loan

नागपूर येथे होत असलेल्या निधी वितरणाच्या कार्यक्रमात ज्या महिलांनी 01 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत आणि ते अर्ज पात्र झाले आहेत, अशा उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे.

हे पण वाचा » फ्री मध्ये करा आधार कार्ड अपडेट, 14 सप्टेंबर नंतर लागणार शुल्क; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हे पण वाचा » आता ‘लाडकी बहीण’ नंतर केंद्र सरकारने आणली ‘ही’ योजना; महिलांना मिळणार 5 लाख रुपये