Mukhyamantri Yojana Doot: महाराष्ट्र सरकारकडून राज्यांमध्ये “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये देखील कामधंद्याच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या उपक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने 50 हजार योजनादूत नेमणूक करण्यासाठी मान्यता दिली आहे.
या बातमीमध्ये आपण योजनादूत हा उपक्रम नेमका काय आहे, यामध्ये तरुणांना रोजगाराची संधी कशी मिळणार आहे, या योजनेसाठी निवड कशी केली जाणार आहे याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची संपूर्ण सविस्तर माहिती करून देणे, त्यांना योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर या योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करणे यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये 50 हजार योजनादूत निवडण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये “मुख्यमंत्री योजनादूत” हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सरकारच्या तिजोरीवर या योजनेकरिता 300 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागांमध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत नेमण्यात येणार आहे. असे एकूण 50 हजार योजनादूत निवड केली जाणार आहे.
१०,००० रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन या योजनादूतांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रवासाचा खर्च आणि सर्व भत्ते समाविष्टत आहेत. सहा महिन्यांच्या करारावर या योजनादूतांना नेमणूक केली जाणार आहे. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ फक्त 6 महिन्यासाठी योजनादुताचं काम असणार आहे. त्यानंतर ते काम संपुष्टात येणार आहेत.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत नेमण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किंवा शारीरिक पात्रता संबंधित अधिक माहिती आपण जाणून घेऊ.
‘योजनादूत’ साठी उमेदवाराची पात्रता:
- या योजनेकरिता अर्ज करणारा उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे स्मार्टफोन मोबाईल असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
‘योजनादूत’ अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत साठी उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज.
- उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- उमेदवार पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा/ दाखला/ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवासाचा दाखला उमेदवार कडे असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वैयक्तिक बँक खाते असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो आवश्यक राहतील.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सोबत हमीपत्र जमा करणे आवश्यक आहे.
‘योजनादूत’ साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी (https://rojgar.mahaswayam.gov.in/) या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा
योजना दूध संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा भरती प्रक्रिया विषयी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता. ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज छाननी केल्यानंतर पात्र करण्यात येतील. पात्र झालेल्या उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.
‘ही’ महत्वाची बाब लक्षात घ्या..
त्यानंतर सहा महिन्याचा करार केल्याचे उमेदवाराकडून लिहून घेतले जाईल. योजनादूताना देण्यात येणार काम हे शासकीय सेवा म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही याची महत्त्वाची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या नेमणुकीच्या आधारे भविष्यात कोणत्याही शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी किंवा हक्क उमेदवाराकडून सांगितला जाणार नाही. याचे हमीपत्र देखील उमेदवाराकडून लिहून घेण्यात येणार आहे.
हे पण वाचा » “या” कारणामुळे बहुतांश महिलांना “लाडकी बहीण” योजनेचे ३०००/- जमा झाल्याचा मेसेज आला नाही
हे पण वाचा » कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर ‘हे’ काम करा..