PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये ‘पीएम आवास योजना’ आणि ‘उज्ज्वला गॅस योजना’ सारख्या योजनांचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची नवीन योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे नाव पीएम सूर्य घर मोफत वीज योजना आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना स्वस्त ऊर्जा देणं आणि वीज बिलाचा भार कमी करणे हा आहे.
300 युनिट मोफत वीज आणि सौर रुफटॉप अनुदान
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत, नागरिकांना दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. यासोबतच, घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानही दिलं जात आहे, ज्यामुळे सौरऊर्जा उत्पादनाला चालना मिळेल. सोलर रुफटॉपसाठी मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 78,000 रुपयांपर्यंत दिली जात असून, ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
७ दिवसात मिळणार अनुदान
सध्या या योजनेत सबसिडी प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण केली जाते, मात्र सरकारने आता नागरिकांना सात दिवसांत अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना जलद अनुदान मिळून सोलर पॅनल बसवण्याची प्रक्रिया सोपी करता येईल. सरकार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मदतीने सबसिडी प्रक्रिया जलद गतीने निकाली काढण्यासाठी काम करते आहे.
सौरऊर्जा उत्पादनातून कमाईची संधी
या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे नागरिक सोलर पॅनलद्वारे त्यांच्या गरजांपेक्षा जास्त वीज तयार करू शकतात, जी सरकारला विकू देखील शकतात. यामुळे वीज बिल तर कमी होईलच, त्याशिवाय जास्त वीज उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न सुद्धा मिळू शकणार आहे.
हे पण वाचा » जमीन धारकांची चिंता मिटली! “इ-मोजणी- २” द्वारे होणार अवघ्या तासाभरात जमीची मोजणी!
सोलर रुफटॉप अनुदानाचे फायदे
सरकार सोलर रुफटॉप बसवण्यासाठी विविध क्षमतेनुसार अनुदान देत आहे:
- 2 किलोवॅटपर्यंत: प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान.
- 3 किलोवॅटपर्यंत: प्रति किलोवॅट 48,000 रुपये अनुदान.
- 3 किलोवॅटपेक्षा जास्त: प्रति किलोवॅट 78,000 रुपये अनुदान.
या अनुदानामुळे सोलर पॅनल बसवण्याचा खर्च कमी होतो आणि नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा वापराची संधी मिळते.
1.30 कोटी नागरिकांनी केली नोंदणी
फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेत, आतापर्यंत 1.30 कोटींहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे, तर 18 लाख अर्ज सादर करण्यात आले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश आहे 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणं आणि सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे.
हे पण वाचा » आता Airtel ची FD सुविधा! बँकांपेक्षा अधिक व्याजदर; मोबाइलवर सुरू करा, ते ही घरी बसून..
अनुदान प्रक्रियेत सुधारणा
सरकार सबसिडी प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी नॅशनल पोर्टलद्वारे बँक-एन्ड इंटिग्रेशनला जलद करण्यासाठी काम करत आहे. यामुळे बँक खात्यांची तपासणी आणि धनादेश प्रक्रियेत लागणारा वेळ वाचेल, आणि अनुदान मिळण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना नागरिकांसाठी एक मोठी कामाची योजना आहे. या योजनेमुळे मोफत वीज, सोलर पॅनल अनुदान, आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळते आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे पर्यावरण स्नेही ऊर्जा तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होत आहे, वीज बिलाची बचत होत आहे, आणि जास्तीत जास्त नागरिक या योजनेचा लाभ घेऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांकडे वळत आहेत.