Ladaki Bahin ST ticket discount

लाडक्या बहिणींचा ST प्रवास महागणार? तिकिटाची 50% सवलत रद्द होणार? जाणून घ्या..

Ladaki Bahin ST ticket discount: महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी विविध लाभदायी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्या अंतर्गत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या एसटी बस मधून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 18 लाख एवढी आहे. या महिलांना एसटी बस मध्ये तिकीट दरासाठी 50 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. त्यासाठी दर महिन्याला 240 कोटी रुपये सरकारकडून महामंडळाला द्यावे लागतात.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला जवळपास 3800 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात. दुसरीकडे एसटी दरामध्ये 50 टक्क्यांची सवलत देखील द्यावी लागते. त्यासाठी राज्य सरकारकडून 240 कोटी रुपयांचा खर्च दर महिन्याला होतो.

याच पार्श्वभूमीवर एसटी बस मध्ये तिकीट दरामध्ये सवलत देण्यात येणाऱ्या महिलांना ती सवलत बंद करण्याची चर्चा होत होती. सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब लागत होता. त्यामुळे एसटी महामंडळासमोर अनेक अडचणी निर्माण होत होतात असे देखील त्या चर्चेमागे कारण देण्यात येत होते.

राज्यातील एसटी महामंडळाकडून प्रवास करण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या एकूण 55 लाख एवढी आहे. त्यामध्ये 18 ते 20 लाख प्रवासी या महिला आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारला एकूण 360 कोटी रुपयांची सवलत नागरिकांना द्यावी लागत आहे. त्यामध्ये फक्त 240 कोटी रुपये महिलांसाठी खर्च करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलत यापुढे देखील सुरू राहणार आहे. ही सवलत योजना बंद करण्याचा कोणताही विचार शासनाचा नाही. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे.