Edible oil rate hike: सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्कात 10% वाढ केल्याने खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. ही वाढ सोयाबीन, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलांच्या किंमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
ग्राहकांवरील परिणाम:
सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कच्च्या सोयाबीन, पाम तेल, आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20% वाढ केली आहे. याचबरोबर, रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75% वरून 35.75% पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
परिणामी, ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे एकीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, पण दुसरीकडे सामान्य ग्राहकांना तेलाच्या दरवाढीचा आर्थिक भार सहन करावा लागेल.
तेलाच्या किंमतीत झालेली वाढ:
- सोयाबीन तेल: ₹110 प्रति किलोवरून ₹130 पर्यंत वाढले.
- शेंगदाणा तेल: ₹175 प्रति किलोवरून ₹185 पर्यंत वाढले.
- सूर्यफूल तेल: ₹115 प्रति किलोवरून ₹130 पर्यंत वाढले.