या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद! लवकर करा ‘हे’ काम | Ration Card eKYC last date

Ration Card eKYC last date: सध्या शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे आधार, बँकेचे खाते किंवा इतर कोणत्याही शासकीय लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. रेशनकार्ड धारकांसाठीही हे नियम लागू झाले असून, १ डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. रेशन कार्ड ची ई-केवायसी दोन पद्धतीने करता येऊ शकते, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

पुरवठा विभागाने दिले स्पष्ट निर्देश

सरकारने केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या प्रक्रियेत रेशनकार्ड धारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पडताळणी करावी लागेल. अन्यथा, संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा:  महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!

रेशन कार्ड ई-केवायसी कशी करायची?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, कार्ड धारकांनी त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ईपॉस (POS) मशीनने केवायसी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. मशीनमध्ये आधार क्रमांक टाकल्यानंतर, बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ऑनलाइन ई-केवायसी कशी करायची?

याशिवाय, “मेरा राशन” या अ‍ॅपच्या मदतीनेही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. गुगल प्ले स्टोअरवरून “मेरा राशन” अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करावे लागेल.

हे पण वाचा:  फ्री मध्ये करा आधार कार्ड अपडेट, 14 सप्टेंबर नंतर लागणार शुल्क; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

आधार सिडिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर “Yes” किंवा “No” असे ऑप्शन दिसेल. “Yes” असल्यास त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही, तर “No” असल्यास त्याला प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली!

सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबरपासून सुरु झालेली ही प्रक्रिया १ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती, आणि आता १ डिसेंबरपर्यंत याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर ई-केवायसी न केलेल्यांना रेशनकार्डावरून लाभ मिळणार नाही, आणि त्यांची नावे काढून टाकली जाऊ शकतात.

हे पण वाचा:  शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, केंद्र सरकारने दिली "डिजिटल कृषी मिशन" ला मंजुरी; जाणून घ्या सविस्तर..

हे पण वाचा » BSNL दिवाळी धमाका ऑफर! रीचार्ज प्लॅनमध्ये घसघशीत सूट; ५०० TV चॅनेल पहा मोफत

हे पण वाचा » पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या..