Ration card e-kyc process

घरबसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची? स्टेटस कसं चेक करायचं? पहा..

Ration card e-kyc process: राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाचा उद्देश देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नसुरक्षा पुरवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत, देशभरातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना स्वस्त दरात अन्न धान्य पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे शिधापत्रिका (Ration Card) असणे आवश्यक आहे.

पण, शिधापत्रिका धारकांसाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शिधापत्रिका धारकांनी येत्या 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळणार नाही.

रेशन कार्ड ची ई-केवायसी करणे का गरजेचे आहे?

ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक शिधापत्रिका धारकाला त्याच्या ओळखपत्राशी जोडण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक लाभ हा योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे का याची खात्री केली जाणार आहे. शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असेल किंवा नवीन सदस्य जोडायचा असेल तर ई-केवायसीच्या मदतीने ती माहिती अपडेट करता येते.

रेशन कार्ड ई-केवायसी कशी तपासावी?

ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल:

  • मेरा राशन ॲप डाऊनलोड करा: सर्वांत अगोदर Google Play Store वर जाऊन “Mera Ration” ॲपडाऊनलोड करा.
  • ॲप मध्ये माहिती भरा: ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
  • आधार सिडिंग तपासा: माहिती सबमिट केल्यानंतर “आधार सिडिंग” पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे “Yes” किंवा “No” असे ऑप्शन दिसतील.
    Yes: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण आहे.
    No: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.

कशी करावी रेशन कार्ड ची e-kyc?

ज्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्या सदस्याची ई-केवायसी करण्यासाठी खालीलप्रमाणे पद्धत वापरा:

  1. राज्य खाद्य पुरवठा विभागाच्या वेबसाइटला भेट द्या: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://rcms.mahafood.gov.in/ जा.
  2. आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा: तिथे तुमच्या शिधापत्रिका क्रमांकासह संबंधित सदस्याचा आधार क्रमांक जोडावा लागेल.
  3. माहिती जमा करा: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेची ई-केवायसी अपडेट होईल आणि तुम्हाला लाभ मिळणे चालू राहील.

शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2024

31 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. या तारखेनंतर ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य मिळणे बंद केले जाईल. त्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

हे पण वाचा » गुंतवणुकीवर भरघोस व्याजदर देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 10 योजना! जाणून घ्या व्याजदर..

हे पण वाचा » 11 दिवस धुवाधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज