UPI Cash deposit system: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा भारतात डिजिटल पेमेंट्ससाठी अत्यंत लोकप्रिय पर्याय म्हणून पुढे आला आहे. युपीआयमुळे पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे खूप सोपे झाले आहे, त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार डिजिटल पद्धतीने अधिक जलद आणि सुरक्षित होत आहेत. युपीआय वापरून आतापर्यंत एखाद्याला पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे एवढेच काम होते, परंतु त्यामध्ये आता एक नवीन फीचर आले आहे, ज्यामुळे युपीआयचा वापर करुन तुम्ही बँक खात्यातही पैसे जमा करू शकता. या नवीन फीचर बद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
UPI चे नवीन फीचर
हे नवीन फीचर विशेषतः त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे जे लोक नेहमी बँकेत जाऊन पैसे जमा करतात. पारंपरिक पद्धतीत, बँकेत जाऊन कॅश डिपॉझिट करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते, त्यात वेळ जातो, आणि एवढा वेळ खर्च करणार या धावपळीच्या युगात अनेकांना शक्य होत नाही. आता, या समस्येवर युपीआयने उपाय काढल्याने, ग्राहक बँकेत जाऊन रांगेत उभे न राहता केवळ त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने पैसे खात्यात जमा करू शकतात.
कोणत्या बँकांकडून ही सुविधा दिली जाते?
UPI द्वारे कॅश डिपॉझिट करण्याची सुविधा अनेक मोठ्या बँकांकडून दिली जाते. जसे की, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि युनियन बँक (Union Bank) या नवीन यूपीआय फीचर द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा ग्राहकांना देतात. या फीचरचा वापर करून ग्राहक अगदी काही मिनिटांमध्ये कोणत्याही खात्यावर कॅश डिपॉझिट करू शकतात. यामुळे अनेकांचा वेळ वाचणार आहे आणि ही प्रक्रिया सुलभ असून सुरक्षित देखील आहे.
डिजिटल पेमेंटचा वाढता वापर
भारत सरकार आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय (NPCI) यांनी डिजिटल पेमेंटला अधिक चालना देण्यासाठी अनेक नवीन फीचर लॉन्च केले आहेत. नुकतीच NPCI ने डेलिगेटेड पेमेंट सिस्टम (Delegated Payment System) यावर आधारित “UPI सर्कल सेवा” भारतामध्ये सुरू केली आहे. या नवीन सेवेमुळे भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सक्षम आणि प्रगत होण्याचे दिशेने वाटचाल करत आहे.
पैसे जमा करण्याची पद्धत
यूपीआय द्वारे कॅश डिपॉझिट मशीन मधून खात्यावर पैसे कसे जमा करायचे त्याची प्रोसेस जाणून घेऊ.
- बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनवर तुम्हाला एक QR कोड दिसेल.
- युपीआय ॲपच्या मदतीने तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता.
- त्यानंतर UPI ॲप ठेवीची रक्कम दाखवेल ती बरोबर असल्याची खात्री करा.
- ज्या बँक खात्यात पैसे जमा करायचे आहे ते निवडावे
- आणि युपीआय पिन टाकून व्यवहार पूर्ण करा.
ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदातच पूर्ण होईल, ज्यामुळे बँकेत जाऊन कॅश डिपॉझिट करण्याची गरज भासणार नाही.
UPI सर्कलचे फायदे
युपीआय सर्कल मध्ये दोन प्रकारचे युजर्स समाविष्ट असतात. एक म्हणजे प्रायमरी आणि दुसरे सेकंडरी यूजर. प्रायमरी युजर्स त्यांचे स्वतःचे खाते तयार करून त्यावर सेकंडरी युजर्स ला जोडू शकतात. हे फीचर अशा लोकांसाठी उपयुक्त आहे की, ज्यांचे स्वतःचे बँक खाते नाही पण त्यांना डिजिटल पद्धतीने पेमेंट करायचे आहे. प्रायमरी यूजर सेकंडरी युजरला काही मर्यादा देखील घालू शकतो. जसे की, एका दिवसात तो किती रक्कम खर्च करू शकतो, इ.
या सर्कलमध्ये युजरला 5 लोक जोडण्याची मर्यादा दिलेली आहे आणि प्रत्येक पेमेंट वर तो लक्ष देखील ठेवू शकतो. यामुळे बँक खाते नसणाऱ्या वापरकर्त्याला देखील यूपीआय प्रणालीचा वापर करून पेमेंट करण्याची सुविधा मिळते.
यूपीआयच्या या नवीन फीचर मुळे डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे सर्व सामान्यांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर होत आहे. कॅश डिपॉझिट करण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. डिजिटल पेमेंट सिस्टम भारतामध्ये अधिक प्रगत बनत आहे. यूपीआय सर्कल सारख्या सेवांमुळे बँक खाते नसणाऱ्या लोकांना देखील डिजिटल पेमेंट चा लाभ घेता येणार आहे. भारतातील डिजिटल क्रांतीमध्ये हे नवीन पाऊल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हे पण वाचा » रेल्वेची नवीन AI तिकीट बुकिंग सेवा, आता बोलून तिकीट बुक करा! जाणून घ्या..
हे पण वाचा » रेशन कार्ड साठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती