‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे खत्यातून कट होऊ लागले! पहा.. तुमचे देखील झाले आहेत का?

Ladki Bahin Yojana Bank Charges Cut: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेली ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देणे त्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. ही मदत महिलांच्या दैनंदिन खर्चासाठी हातभार लावणार आहे.

विशेषतः ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात अर्ज भरलेल्या महिलांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. परंतु, याचवेळी महिलांसाठी काही अडचणी देखील समोर आले आहेत. लाभार्थी महिलांचे पैसे कापण्याचा मुद्दा आता समोर आलेला आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी..

ग्रामीण भागातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे. कारण, बहुतांश आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे लाभार्थी हे ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही रक्कम अत्यंत उपयुक्त आहे. महिलांना याची गरज सुद्धा आहे. ज्या महिलांना उत्पन्नाचे साधन कमी आहे किंवा त्यांचे आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा महिलांना या योजनेतून अर्थसहाय्य मिळत आहे.

हे पण वाचा:  अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून 1 लाखांचे अर्थसाहाय्य; अनेक महत्वाचे निर्णय - देवेंद्र फडणवीस

‘या’ महिलांची रक्कम कपात

राज्यातील अनेक बँकांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम कपात करण्यात आल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणावरून समोर आल्या आहेत. अनेक महिलांनाही पैसे बँकेकडून कापले गेल्याचं कळताच त्यांनी त्या संबंधित तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून बँकांनी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी मंत्रालयाने बँकांशी पत्रव्यवहार देखील सुरू केलेला आहे.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या..

सर्व बँकांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. या तक्रारीमुळे महिलांना मिळालेले पैसे बँकेतून काढता येत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी पंधराशे रुपये ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे. त्यातील काही रक्कम कापली गेली तर त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

हे पण वाचा:  'या' तारखेपासून सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले..

हे पण वाचा » सरकारची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” योजना, 2 वर्षे पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा!

महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी चर्चा करण्याचे नियोजन सुरू झालेले आहेत. सरकारने बँकांना सुचित केले आहे की, लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत आणि लाभार्थी महिलांना संपूर्ण रक्कम देण्यात यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी 1500 रुपये ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे. पण बँकांकडून अनेक चार्जेस कापून घेतल्यामुळे त्यातील रक्कम कमी होत आहे. त्याचा महिलांना अतिशय त्रास होत आहे.

हे पण वाचा:  महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!

अनेक महिलांकडून तक्रारी दाखल

या समस्येमुळे महिला तक्रारी करू लागल्या आहेत. महिला व बालविकास मंत्रालयाकडून याची दखल घेण्यात आलेली असून बँकांशी चर्चा देखील सुरू झाली आहे. सरकारने बँकांना सुचित केले आहे की, लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत आणि त्यांना संपूर्ण रक्कम देण्यात यावी. यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी महिलांना येत आहेत त्यामध्ये पैसे कपात होण्यासारखी अडचण समस्या मोठी आहे.

हे पण वाचा » 90 दिवसांसाठी सोयाबीनला किमान 4892/- रुपये हमीभावाने खरेदी मिळणार!

महिला व बालविकास मंत्रालयाने लाभार्थी महिलांना संपूर्ण लाभ देण्यात यावा आणि बँकांशी असलेला संवाद अधिक स्पष्ट करून त्याचे लवकरात लवकर निराकरण करण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणी अंमलबजावणी मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.