Post office saving schemes 2024: सध्याच्या काळात भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोक आर्थिक गुंतवणुकीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. सध्या गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरीही पोस्ट ऑफिस सारख्या सुरक्षित पर्यायाकडे अनेकांचा कल असतो. पोस्ट ऑफिसच्या योजना आपल्या ग्राहकांसाठी मोठ्या लाभ देणाऱ्या आहेत. ज्यामध्ये सुरक्षिततेबरोबरच चांगले व्याजदर देखील मिळते.
पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम सुरक्षित राहते आणि तुम्हाला दर तीन महिन्यांनी व्याजदर अपडेट करून दिले जातात. चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे व्याजदर पोस्ट ऑफिस कडून घोषित करण्यात आले आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीचे व्याजदर जाहीर केले जातील. चला तर मग पोस्ट ऑफिस च्या विविध योजनांचा आढावा आपण या लेखांमध्ये घेऊया आणि कोणत्या योजनेमध्ये किती व्याजदर दिले जाते यासंबंधीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
Post office saving schemes 2024:
योजनांचे नाव | व्याजदर (%) | कालावधी |
पोस्ट ऑफिस बचत खाते | 4 | चालू |
पोस्ट ऑफिस FD | 6.9 (1 वर्ष), 7.5 (5 वर्ष) | 1 वर्ष, 5 वर्ष (आणि इतर) |
पोस्ट ऑफिस RD | 6.7 | 5 वर्ष |
सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम | 8.2 | – |
मंथली इन्कम स्कीम (MIS) | 7.4 | – |
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) | 7.7 | – |
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) | 7.1 | 15 वर्ष |
किसान विकास पत्र (KVP) | 7.5 | 115 महिने |
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र | 7.5 | 2 वर्ष |
सुकन्या समृद्धी योजना | 8.2 | 21 वर्ष |