लाडकी बहीण योजना, ‘या’ तारखेला खात्यात जमा होईल ३रा हप्ता?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 3rd instalment date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आसणाऱ्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. पण, हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख काय असेल आणि किती रक्कम जमा होणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे अडचणी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना 31 जुलैची अर्जाची शेवटची तारीख साधता आली नाही. ज्या महिलांनी अर्ज केला नाही त्यांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती, परंतु यामुळे त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला नव्हता.

हे पण वाचा:  फ्री मध्ये करा आधार कार्ड अपडेट, 14 सप्टेंबर नंतर लागणार शुल्क; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळतील?

सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून लाभ दिला जाईल, त्यांच्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा लाभ मिळणार नाही. अर्ज करताना अंगणवाडी सेविका हा पर्याय निवडणे आवश्यक आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद आहेत.

लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार घडल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊले उचलले आहेत.

हे पण वाचा:  मतदार यादीत स्वतःचे नाव कसे तपासायचे? जाणून घ्या 'ही' सोपी ऑनलाइन पद्धत!

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

किती पैसे जमा होणार?

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचा एकत्रित 4500 रुपयांचा लाभ जमा केला जाणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे तीन महिन्यांचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या हप्त्याचे पैसे 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तरी, याबाबत सरकारने अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

हे पण वाचा:  तुमच्या एरियात BSNL ची रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वी असे करा चेक.. | How can I check BSNL 4G in my area

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 1 कोटी 59 लाख महिलांना 4787 कोटी रुपयांचा लाभ दिला गेला आहे. सप्टेंबर महिन्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.