शेतकऱ्यांनो! हमी भावापेक्षा कमी दर मिळाला तर त्याची भरपाई सरकार देणार.. | Bhavantar Bharpai Yojana Maharashtra

Bhavantar Bharpai Yojana Maharashtra: कापूस, सोयाबीनसारख्या मुख्य पिकांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती कठीण झाली होती. अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदे होण्याची आशा आहे.

भावांतर योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली आहे. “हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल,” असे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय, भविष्यात जर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले, तर यातील असणारा फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा:  झटक्यात लखपती व्हा! पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळवा 3 लाख; ही कागदपत्रं आवश्यक..

शेतकऱ्यांना ‘या’ सवलती देण्याचे सरकारचे वचन

आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. शेतकऱ्यांना वीज पुरवठा आणि सिंचनासाठीही सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फडणवीस यांनी सांगितले की, दिवसा १२ तास वीज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी शेतावर जाऊन काम करण्याची गरज भासणार नाही.

हे पण वाचा:  पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या.. | Post office saving scheme

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस निर्णय

फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. महिलांना ST सेवेमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. या योजनेमुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत असतानाही, महिला प्रवासांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एसटीला नफा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना प्रवासाची सवलत मिळाल्याने त्यांचा खर्च कमी झाला आहे.

लाडकी बहीण योजना

“लाडकी बहीण” योजनेसाठी देखील सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या योजनेत दर महिन्याला महिलांना १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीच्या विरोधानंतर कोर्टाने योजनेला संमती दिली, आणि सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे खात्यावर जमा केले. यामध्ये आणखी वाढ करून महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

हे पण वाचा:  4 लाख रुपयांचा सौरपंप मोफत! शेतकऱ्यांनो 'येथे' लगेच अर्ज करा..अर्ज सुरू झाले!

शेतकऱ्यांच्या मनात काय दडलंय?

अमरावती जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणाला, “माझ्या शेतमालाची विक्री करतांना मी नेहमीच भाव कोसळल्याने तडजोड करीत होतो. पण फडणवीस यांच्या भावांतर योजनेमुळे आम्हाला थोडासा दिलासा मिळाला आहे. आता आम्हाला कमी दरामधे देखील शेतमाल विकता येईल, कारण सरकार आपल्याला त्यातील फरकाची रक्कम देऊ करणार आहे.”