लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या…

Aditi Tatkare on  Mazi Ladki Bahin Yojana: राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळतील. याशिवाय, ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्यांचेही पैसे लवकरात लवकर खात्यात जमा केले जातील.

अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे, आणि सरकार यावर वेगाने काम करत आहे. तटकरे यांनी सांगितले की, या योजनेसाठी सुमारे 2 कोटी 40 लाखांहून अधिक अर्ज जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्यांचा लाभ मिळणार आहे.

हे पण वाचा:  आता रेशनवर धान्य मिळणार समसमान, केंद्र सरकारचा नवीन नियम लागू; जाणून घ्या..

सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्जांची छाननी होऊन, दोन कोटी महिलांना लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारचा अंदाज आहे की ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत विस्तारली जाईल. योजनेतून दर महिन्याला जास्तीत जास्त महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळावा, हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

महिला सुरक्षा आणि शक्ती कायदा

महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना, आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा प्रस्ताव सादर केला आहे. या कायद्याच्या अनेक बाबी केंद्र सरकारच्या विद्यमान कायद्यांमध्ये समाविष्ट आहेत, तरीही राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.

हे पण वाचा:  तुम्हाला न सांगता गुपचुप कुणी तुमच्या आधार कार्डचा वापर करतंय का? असे करा चेक | How to secure our Aadhar details

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

महिलांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक मदत योजना असून, यामुळे राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होणार आहे.