Ajit Pawar on Mofat 3 Gas Cylinder Maharashtra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना आता वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीपुढे बसून धूर फुंकण्याची गरज राहणार नाही, असे पवारांनी सांगितले. ते मोहळमध्ये आयोजित जनसंवाद यात्रेत बोलत होते. या योजनेतून राज्यातील महिलांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडर खरेदीचा ताण कमी होणार आहे. तसेच अजित पवार यांनी हे योजना पारदर्शक पद्धतीने चालवली जाईल याची ग्वाही सुद्धा दिली आहे.
गरिबांच्या शिक्षणासाठी मोठा निधी
गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी अजित पवारांनी 1,500 कोटींचा निधी देऊन मोफत शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. “सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातूनच साडे सहा लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे,” असे पवारांनी सांगितले. महाराष्ट्राचा जीएसटीमध्ये 16% वाटा आहे, आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलातून महिला, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
सर्वांसाठी योजनांचा समावेश
“आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके,” असे सांगत अजित पवारांनी वारकरी, ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम, मातंग, मराठा, ओबीसी आणि आदिवासी समुदायांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. विशेषतः मुस्लिम समाजासाठी 1,000 कोटींची मदत आणि कर्जाच्या हमीची घोषणा देखील केली आहे.
शेतकऱ्यांसाठी सौर उर्जेचा वापर
शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पाणीपुरवठा पंप मागेल त्याला देण्याची योजना आणल्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. “शेतकऱ्यांना आता लाईट बिल भरण्याचा ताण राहणार नाही, फक्त पाणीपट्टी भरावी लागेल,” असे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकाधिक आमदार निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यात्रेतून बोलताना केले.
त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात सध्या 9,500 मेगावॅट सोलर ऊर्जा उत्पादन सुरु आहे, आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. अजित पवारांच्या या घोषणांनी महाराष्ट्रातील rमहिलांसह शेतकरी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण केला आहे.
हे पण वाचा » झटक्यात लखपती व्हा! पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळवा 3 लाख; ही कागदपत्रं आवश्यक..
हे पण वाचा » ‘या’ तारखेपासून सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले..