BSNL दिवाळी धमाका ऑफर! रीचार्ज प्लॅनमध्ये घसघशीत सूट; ५०० TV चॅनेल पहा मोफत | BSNL Diwali offer 2024 list

BSNL Diwali offer 2024 list: नुकतेच टाटा समूह आणि BSNL यांच्यातील भागीदारी नंतर BSNL ला नवसंजीवनी मिळाली आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देत BSNL आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. कंपनीने अलीकडेच नवीन लोगो आणि घोषवाक्य सुद्धा लाँच केलं असून, 7 नवीन सेवा देखील सुरू केल्या आहेत.

जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर BSNL ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५५ लाख नवीन वापरकर्ते BSNL कडे वळले असून, लवकरच कंपनी संपूर्ण देशभरात 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

BSNL ची मोफत लाईव्ह टीव्ही सेवा

दिवाळीच्या मुहूर्तावर BSNL ने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कंपनीच्या फायबर ब्रॉडबँड सोबत आता ५०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल मोफत दिली जात आहेत. BSNL ने नुकतंच देशातील पहिलं IFTV (Internet Fiber Television) लॉन्च केलं आहे. यामुळे वापरकर्त्यांना लाईव्ह आणि प्रीमियम पे-टीव्ही चॅनेल्स निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.

हे पण वाचा:  या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद! लवकर करा 'हे' काम | Ration Card eKYC last date

BSNL फायबर ब्रॉडबँडचे दर आणि सुविधा

ग्रामीण भागासाठी – मासिक शुल्क: २४९ रुपये
शहरी भागासाठी – मासिक शुल्क: ३२९ रुपये

कंपनीच्या X (पूर्वीच्या Twitter) हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे की प्रत्येक BSNL फायबर ब्रॉडबँड वापरकर्त्याला IFTV वर मोफत मेंबरशिप दिले जाणार आहे.

BSNL च्या वार्षिक प्लॅनवर दिवाळी सवलत

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने १ वर्षाच्या वैधतेच्या १९९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत कमी करून १८९९ रुपये केली आहे. ही विशेष ऑफर ७ नोव्हेंबरपर्यंत वैध असणार आहे.

हे पण वाचा:  'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खत्यातून कट होऊ लागले! पहा.. तुमचे देखील झाले आहेत का?

१८९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनची वैशिष्ट्ये

  • अमर्यादित कॉलिंग
  • दररोज १०० मोफत SMS
  • ६०० GB डेटा (१ वर्षासाठी)

BSNL ला टाटा समूहाची साथ

टाटा समूहासोबतच्या भागीदारीनंतर BSNL च्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा झाली आहे. BSNL आता खासगी कंपन्यांना कडवी स्पर्धा देत ​​आहे. 4G सेवा सुरू केल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा फायदा मिळेल, ज्यामुळे BSNL चं नेटवर्क अधिक सक्षम होणार आहे.

हे पण वाचा:  लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या...

ग्राहकांना BSNL वापरण्याची सुवर्णसंधी

टाटा समूहासोबतच्या सहयोगानंतर कंपनीच्या आकर्षक ऑफर्स, किफायतशीर ब्रॉडबँड योजना आणि वाढीव नेटवर्क सेवा यामुळे ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात BSNL यशस्वी होत आहे. जर तुम्ही कमी खर्चात चांगल्या सेवा आणि भरपूर सुविधा घेऊ इच्छित असाल, तर BSNL च्या या दिवाळी ऑफर्सचा 7 नोव्हेंबरपूर्वी निश्चित लाभ घ्या.

हे पण वाचा » Jio ची दिवाळी निमित्त खास ऑफर! 699 रुपयांत 4G फोन, ज्यात live टीव्ही, चित्रपट, इंटरनेट सह अनेक सुविधा..

हे पण वाचा » पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या..