How many people in a family can get Ayushman card: आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत आरोग्य सेवा-सुविधा देणं आहे. ही योजना लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देण्यात येतं, ज्याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. जे दवाखाने शासन मान्यता प्राप्त आहेत अशा सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये होणारे उपचार समाविष्ट केले आहेत.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 70 वर्षांवरील नागरिकांसाठी या योजनेत मोठा बदल करण्यात आला. या बदलामुळे आता सर्व वृद्धांना या योजने अंतर्गत लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
आयुष्मान भारत योजना बाबत केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजनेचा सरसकट लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे कोणत्याही उत्पन्नाच्या अटी शिवाय, सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आणि सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे गरजू आणि वृद्ध नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांसाठी मोठा आधार मिळणार आहे. यापूर्वी जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते, त्यांना आता 5 लाख रुपयांचा अतिरिक्त कव्हरही मिळणार आहे.
34 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार
आधिकृत आकडेवारीनुसार, 30 जून 2024 पर्यंत 34.7 कोटींहून अधिक नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड तयार केले आहेत. यामुळे जवळपास 7.37 कोटी नागरिकांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मोफत उपचारांचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत देशभरात 29,000 हून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवा दिल्या जातात. याचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब आणि वंचित घटकांना होतो आहे.
5 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा कव्हर मिळणार
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, आयुष्मान भारत योजनेतील नव्या बदलांमुळे 70 वर्षांवरील वयोवृद्धांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून, त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा कव्हर देण्यात येईल. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच आरोग्य विम्याचा लाभ मिळतो आहे, त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचे कव्हर सुद्धा मिळणार आहे.
योजनेत सहभागी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून नवीन आणि स्वतंत्र आयुष्मान कार्ड दिलं जाणार आहे. जर ते आधीच कोणत्या तरी आरोग्य योजनेत सहभागी असतील, तर त्यांना आयुष्मान भारत योजनेत स्विच करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा X पोस्टच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली आहे.
हे पण वाचा » आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..
एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान कार्ड काढता येते?
या योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, एका कुटुंबातील कितीही सदस्य आयुष्मान कार्ड मिळवू शकतात? सरकारने या योजनेत अशी कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही. प्रत्येक कुटुंबातील पात्र सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे कुटुंबातील कितीही सदस्य आयुष्मान कार्ड मिळवू शकतात.
आयुष्मान भारत योजनेच्या पात्रतेचे निकष
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही विशिष्ट पात्रतेचे निकष ठरवलेले आहेत. विशेषत: ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक, निराधार, अपंग लोक, किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक यासाठी पात्र ठरतात. याशिवाय, रोजंदारी मजूरही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्रतेची तपासणी ऑनलाईन पद्धतीने देखील करता येते. त्यासाठी pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जदार आपला मोबाईल क्रमांक, राशन कार्ड क्रमांक किंवा अन्य माहिती टाकून पात्रतेची तपासणी करू शकतात.
हे पण वाचा » सरकारची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” योजना, 2 वर्षे पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा!
ऑनलाईन पात्रता तपासणी करण्याची प्रक्रिया:
- pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होमपेजवर ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाका आणि सबमिट करा.
- मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- त्यानंतर राज्य निवडा आणि मोबाईल किंवा राशन कार्ड क्रमांक टाका.
- स्क्रीनवर तुमच्या पात्रतेची संपूर्ण माहिती दिसेल.
आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची आरोग्य योजना आहे, ज्यातून देशातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळतो. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत केलेल्या बदलांमुळे वृद्धांच्या स्वास्थ्यात सुधारणा करण्यासाठी अधिक प्रभावी ठरणार असून त्यांना चांगल्या आरोग्यसेवांचा लाभ मिळणार आहे.