How to Apply Ration Card Online Maharashtra: रेशन कार्ड च्या माध्यमातून भारत सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त दरामध्ये पोषक अन्न नागरिक मिळू शकतात. रेशन कार्ड च्या माध्यमातून सरकारकडून धान्य, दाळी, तेल, अन्य अत्यावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना योग्य अन्नपुरवठा मिळू शकतो. घरबसल्या मोबाईल मधून रेशन कार्ड कसे काढायचे यासंबंधीत अधिक माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
रेशन कार्ड म्हणजे काय?
रेशन कार्ड हा एक महत्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. ज्या माध्यमातून गरीब, गरजू नागरिक रेशन दुकानातून स्वस्तामध्ये धान्य खरेदी करू शकतो. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, इत्यादी वस्तूंचा प्रामुख्याने समावेश असतो. या कार्डधारकांना कमी दरामध्ये रेशन दिले जाते. ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना अन्नधान्य स्वस्त खरेदी करून उदरनिर्वाह करता येतो.
ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड कसे काढायचे?
ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड चा अर्ज तुम्ही घरबसल्या करू शकता. आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासाठी अगदी सोप्या शब्दांमध्ये काही स्टेप दिलेले आहेत. पुढील स्टेप फॉलो करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढू शकता.
1. अधिकृत संकेतस्थळावर जा:
रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (rcms.mahafood.gov.in) जावे लागेल.
2. साईन इन / रजिस्ट्रेशन करा:
संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘साईन इन / रजिस्टर’ या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला ‘न्यू यूजर साईन अप हियर’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
3. अर्ज भरा:
त्यानंतर, ‘I want to apply new ration card’ या पर्यायाची निवड करा. इथे तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल. त्यामध्ये अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि नवीन लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल.
4. ओटीपी प्रविष्ट करा:
सर्व माहिती भरल्यानंतर समोर दिसणारा कॅप्चा भरा आणि ‘गेट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, जो टाकून तुम्हाला सबमिट करावे लागेल.
5. लॉगिन करा:
तुमची प्रोफाईल तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करावे. यासाठी ‘रजिस्टर्ड यूजर’ या पर्यायावर जाऊन तुम्ही तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
6. अर्ज सादर करा:
लॉगिन झाल्यानंतर ‘अॅप्लिकेशन रिक्वेस्ट’ मध्ये ‘अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड’ हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करून नवे रेशनकार्ड मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
7. आवश्यक कागदपत्रे:
रेशनकार्डसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात:
- ओळखपत्र
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक
- रहिवासी प्रमाणपत्र
- वीज बिल
- टेलिफोन बिल किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक
- कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
- स्वघोषणापत्र
- चौकशी अहवाल
ही कागदपत्रे भरून सबमिट केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर..
अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला, तर तुमच्या पत्त्यावर तुमचे रेशनकार्ड पाठवले जाईल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. रेशनकार्ड काढण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांना खूप फायदेशीर झाली आहे.
यामुळे वेळेची बचत होते तसेच कोणत्याही दलालांची मदत घेण्याची गरज भासत नाही. याशिवाय अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित असल्याने गरजू व्यक्तींना रेशनकार्ड मिळवणे सोपे झाले आहे.
रेशनकार्ड हे एक महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे. ज्याद्वारे गरिबांना स्वस्त दरात धान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मिळू शकतात. ऑनलाईन पद्धतीमुळे आता हे कार्ड काढणे अधिक सोपे झाले आहे. योग्य माहिती आणि कागदपत्रे असल्यास, कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला नवीन रेशनकार्ड मिळवता येईल. सरकारच्या या उपक्रमामुळे समाजातील गरजू लोकांना मोठा आधार मिळतो आहे.
हे पण वाचा » पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..
हे पण वाचा » शेजारचा शेतकरी तुमचा बांध कोरतोय? मग ‘असा’ शिकवा त्याला कायदेशीर धडा; पुन्हा हिम्मत नाही करणार!