Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत, महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये मिळणार आहेत. शिंदे यांनी सांगितले “आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो.”
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना धोरणात्मक आधार देण्याची ग्वाही दिली. “शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे,” असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पद्धतीचे धोरण पुढे चालवण्याची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, किमान १५,००० रुपये वार्षिक शेतकरी सन्मान योजना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले “राज्यातील कोणीही उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला अन्न आणि निवारा मिळेल,” हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिंदे सरकारने वृद्ध पेन्शनधारकांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला. वृद्ध पेन्शनधारकांना १५०० रुपये पेक्षा २१०० रुपये मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी रोजगार निर्मितीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकार 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्यास तयार आहे. यामध्ये २५ लाख नवे रोजगार तयार करण्याची योजना आहे.
या योजना राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिंदे सरकारने केलेल्या या निर्णयांमुळे राज्यातील नागरिकांना अधिक सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी मदत होईल.