Lowest interest rate banks in India: जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं, वाहन खरेदी करायचं किंवा FD मध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल, तर सध्या चालू असलेल्या बँकांच्या आकर्षक ऑफर्स (Diwali loan offers) चा लाभ घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा उत्सवांच्या मुहूर्तावर अनेक बँका ग्राहकांना विशेष व्याजदर आणि सवलती देत आहेत.
गृहकर्ज (Home loan), वाहन कर्ज (Car loan), पर्सनल लोन (Personal loan) याबरोबरच फिक्स्ड डिपॉजिटवरही अनेक बँक आकर्षक व्याजदर देत आहेत, या काळात गुंतवणुक करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊ.
गृह आणि वाहन कर्जासाठी योग्य बँकिंग पर्याय
सणासुदीच्या काळात काही निवडक बँका अतिशय कमी व्याजदरांवर कर्ज देत आहेत. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि यूनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकांनी गृहकर्ज, वाहनकर्ज, पर्सनल लोनवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
बँक ऑफ बडोदा 8.40% व्याजदराने गृह कर्ज देत असून त्यावर प्रोसेसिंग फी देखील आकारली जात नाही. या बँकेत कार कर्ज घ्यायचं झाल्यास 8.95% व्याजदराने ती दिले जाते. 10.80% व्याजदराने पर्सनल लोन देखील बँक ऑफ बडोदा उपलब्ध करून देत आहे.
फिक्स डिपॉझिट वर 7.30% व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80% व्याजदर मिळत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ बडोदा शाखेला भेट द्या. बँक ऑफ बडोदा मध्ये FD केली असता सर्वसाधारण ग्राहकांना 7.30% व्याज दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याज दर दिला जातो.
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
बँक ऑफ महाराष्ट्र कडून जर तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर ते 8.35% व्याजदराने कोणतेही प्रोसेसिंग फी न करता उपलब्ध करून दिले जात आहे. बँक ऑफ बडोदा पेक्षा हे कर्ज 0.05% व्याज दराने स्वस्त आहे. जर तुम्हाला कार कर्ज घ्यायचे असेल तर ते 8.70% व्याज दराने उपलब्ध करून दिले जाते.
बँक ऑफ बडोदा पेक्षा ते 0.25% कमी व्याजदराने दिले जाते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या या कर्ज सुविधांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाल्यास तुमच्या जवळच्या शाखेला नक्की भेट द्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. SBI सुद्धा गृह कर्ज आणि वाहन कर्ज कमी व्याजदराने ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. शिवाय या दोन्ही कर्जांवर सध्या प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.
याशिवाय जर तुम्हाला स्टेट बँकेमध्ये FD करायची असेल तर त्यावर देखील आकर्षक व्याजदर बँकेकडून दिला जात आहे. गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्या.
दिवाळीच्या मुहूर्तावर घर, वाहन खरेदी फायद्याची
सणासुदीच्या काळात बँका आकर्षक सवलती जाहीर करतात. गृहकर्ज आणि वाहनकर्जावर कमी व्याजदरांसह प्रोसेसिंग फी माफ करण्याच्या ऑफर्स याच कालावधीत जास्त प्रमाणात दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर घर किंवा वाहन खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
जर तुम्ही दीर्घकाळापासून घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचा काळ हा अत्यंत फायद्याचा आहे. बँकांकडून कमी व्याजदरात गृहकर्ज आणि वाहनकर्जासोबतच FD वरही चांगला परतावा मिळत आहे. या काळात प्रोसेसिंग फी सुद्धा माफ केली जात आहे.
हे पण वाचा » PM मोदींची दिवाळी निमित्य मोठी घोषणा; नागरिकांना दरवर्षी मिळणार 5 लाखांपर्यंत लाभ!
हे पण वाचा » पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या..