महाराष्ट्रातील ‘या’ ३ नद्या जोडण्यास मंजुरी; या भागातील शेती होणार कायम बागायती..

Maharashtra river linking project approved: अकोला जिल्हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो आणि या प्रदेशाचा कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी मोठा आधार आहे. अकोला येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी कापूस शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमता आणि आर्थिक स्थितीमध्ये मोठी सुधारणा होईल, असं त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रातील टेक्सटाईल पार्कच्या पायाभरणीचा उल्लेख करत सांगितले की, या पार्कमुळे राज्यात शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील. “या टेक्सटाईल पार्कमुळे शेतकऱ्यांना कापूसाच्या उत्पादनावर अधिक फायदा मिळेल” असं ते म्हणाले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा निर्धार आहे.

हे पण वाचा:  महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!

सिंचन योजनेसाठी सरकारचे प्रयत्न

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील पाणी संकटावरही भाष्य केलं. “काँग्रेसचे सरकार इतकी वर्षे राज्यात होतं, पण त्यांनी विदर्भातील पाणी समस्येवर काहीही लक्ष दिलं नाही. त्याऐवजी, त्यांनी आपल्या खिशात पैसा भरला,” असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

मोदी यांनी सांगितलं की, काँग्रेसच्या काळात सिंचन प्रकल्पांना ब्रेक लागला, परंतु महायुती सरकारच्या अंमलबजावणीमुळे सिंचन योजनेस गती मिळाली आणि यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.

हे पण वाचा:  BSNL चा नवीन प्लॅन! 600 GB डेटा, कॉलरट्यून, OTT सबस्क्रीप्शन, 365 दिवस व्हॅलिडीटी, 5G स्पीड; जाणून घ्या..

या तीन नद्यांच्या जोडणीला मंजूरी

पंतप्रधान मोदी म्हणाले “आम्ही वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा या नद्यांच्या जोडणीची योजना मंजूर केली आहे. यामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील पाणी संकटावर नियंत्रण मिळवता येईल”.

या योजनेवर 90,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेंमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमता आणि सिंचनाची परिस्थिती सुधारेल.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ठोस पाऊल

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या सरकारचे ठोस संकल्पही मांडले. “आम्ही शेतकऱ्यांना कमी पाणी वापरून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी आम्ही विविध योजना राबवत आहोत, ज्यामुळे ते देशाच्या प्रगतीचे नायक बनतील,” असं मोदींनी सांगितले.

हे पण वाचा:  आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट! लगेचंच करा ‘हे’ काम, नाहीतर… | Aadhaar card big update

अकोला आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी या सरकारच्या योजनांमुळे विकासाच्या नव्या दिशा खुल्या होतील. ते म्हणाले की, “आमचा संकल्प आहे की शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा केली जाईल. यामुळे देशाच्या कृषी उत्पादनात वाढ होईल आणि भारताला आर्थिक दृष्ट्या अधिक प्रगल्भ बनवता येईल.”