Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Form: राज्यातील महिलांसाठी सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची नवीन पद्धत (New method of filling application form) लागू करण्यात आली आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ज्यांनी अद्याप योजनेसाठी अर्ज केले नाहीत किंवा त्यांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांच्यासाठी नवीन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता या मुदतीच्या आत अर्ज भरून महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या लेखामधून आपण फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, आणि अर्ज भरण्याच्या नवीन पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचा नवीन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी आता नवीन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा:
- अधिकृत वेबसाईटवर जा: सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- लॉग इन करा किंवा खाते तयार करा: अर्जदार नवीन असल्यास “Create Account” किंवा “नवीन खाते तयार करा” या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचे नाव आधारकार्ड प्रमाणे इंग्रजीत टाका, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव किंवा महानगरपालिका निवडून खाते तयार करा.
- अंगणवाडी सेविकेचा पर्याय निवडा: अर्जामध्ये तुमच्या प्रोफेशनमध्ये अंगणवाडी सेविका पर्याय निवडा आणि टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारा. यानंतर कॅप्चा भरा आणि साइन अप करा.
- फॉर्म भरणे सुरू करा: साइन इन केल्यानंतर, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” पर्यायावर क्लिक करा. येथे आधारकार्ड क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा.
- महिलेची वैयक्तिक माहिती भरा:
- अर्जामध्ये महिलेचे संपूर्ण नाव इंग्रजीत लिहा.
- वडिलांचे किंवा पतीचे नाव, वैवाहिक स्थिती, आणि जन्मतारीख भरा.
- जर महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर “होय” निवडा. जर इतर राज्यात जन्म झाला असेल तर संबंधित राज्य निवडून कागदपत्रे अपलोड करा.
- पत्ता आणि संपर्क माहिती भरा:
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्ड प्रमाणे लिहा.
- जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/ नगरपालिका निवडा आणि तुमचा पिनकोड टाका.
- अर्जाच्या स्थितीबद्दल मेसेज मिळवण्यासाठी अर्जदारचा मोबाईल क्रमांक व्यवस्थित भरा.
- बँक खाते माहिती:
- आधारकार्डशी लिंक केलेले बँक खाते क्रमांक भरा. हे बँक खाते आधारकार्डशी लिंक असल्यास “होय” वर क्लिक करा. जर बँक खाते लिंक नसल्यास, ते लवकरात लवकर लिंक करून घ्या.
हे पण वाचा » शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!
लाडकी बहीण योजनेची आवश्यक कागदपत्रे
अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील:
- आधारकार्ड: आधारकार्डच्या दोन्ही बाजू (समोरील आणि मागील) अपलोड करा.
- अधिवास प्रमाणपत्र: तुमच्याकडे उपलब्ध असल्यास, अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा.
- रेशन कार्ड: जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल, तर त्याची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करा. रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करा.
- हमीपत्र: अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. हे हमीपत्र ऑनलाईन डाउनलोड करून ते वापरू शकता.
- बँक पासबुक: अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत अपलोड करा.
- फोटो: अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे आपलोड केल्यानंतर, डिक्लेरेशन पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करा. अर्ज व्यवस्थित भरला असल्यास, आणि तुम्ही पात्र असल्यास तुमच्या खात्यात योजनेच्या अनुदानाची रक्कम जमा होईल.
हे पण वाचा » लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय; शासन निर्णय जारी!
अर्ज सादर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सूचना
- अर्ज करताना सर्व माहिती बरोबर आणि पूर्ण भरल्याची खात्री करा. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्जाची स्थिती तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे कळवली जाईल. त्यामुळे मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्ज सादर करताना कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात अपलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुधारित पद्धतीने अर्ज भरणे आता सोपे झाले आहे. अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याने, ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत, त्यांनी त्वरित अर्ज करावा.