Ladki Bahin Yojana village ward level status pending: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना अर्थसहाय्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक महिलांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा पातळीवर त्याचे छाननी केली जाते. त्यानंतर पात्र महिलांना अर्ज मंजूर करून महिन्याला 1500/- रुपये राज्य सरकारकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
या योजनेअंतर्गत मागील दोन महिन्यांचा 3000/- हजार रुपयांचा हप्ता झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. परंतु, अर्ज मंजुरीच्या स्थितीवर गाव पातळी किंवा वार्ड पातळीवर अर्ज मंजुरी बाकी असल्याचे स्टेटस दाखवण्यात येत आहे. यावरून अनेक महिला अर्जदारांना मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या महिलांना त्यांचे पैसे मिळणार की नाही याबद्दल प्रश्न पडले आहेत त्यासंबंधीचे अधिक माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ..
महिलांच्या खात्यात पैसे कधी येतात?
महिलांच्या मनात असणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे त्यांच्या खात्यात कधी जमा होतील. योजनेचे नियम आणि प्रक्रिया पाहता, अर्ज मंजूरीनंतर लगेचच पैसे खात्यात जमा होणे अपेक्षित असते, परंतु कधी कधी काही तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर होऊ शकतो. सरकारी योजनांमध्ये संबंधित टप्प्यावर मंजूर होऊन निधी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात येण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो.
महिलांनी अर्जावर “अप्रुव्हल” असा मेसेज पाहिला असल्यास, त्यांचा अर्ज जिल्हा पातळीवर मंजूर झाला आहे आणि निधी येण्यास विलंब झाला असेल तरी, निधी नक्कीच मिळणार आहे, तशी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
गाव/वॉर्ड पातळीवर दाखवला जाणारा पेंडिंग स्टेटस
सध्या अनेक महिलांचे अर्ज जिल्हा पातळीवर मंजूर झाले आहेत. महिलांच्या मोबाईलवर किंवा योजनेच्या पोर्टलवर लॉगिन करून पाहिल्यास, “अर्ज मंजूर झाला आहे” असा संदेश दिसतो. परंतु, काही महिलांच्या अर्जांच्या बाबतीत वॉर्ड किंवा गाव पातळीवर स्टेटस पेंडिंग दिसत आहे, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना असं वाटत आहे की, त्यांचे अर्ज पूर्णपणे मंजूर झाले नाहीत आणि त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
खरंतर, जिल्हा स्तरावर एकदा अर्ज मंजूर केल्यानंतर त्यास अंतिम मंजूरी मिळाली आहे असे समजावे. गाव आणि वॉर्ड पातळीवरील स्टेटस हळूहळू अपडेट होईल, परंतु योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्याचा अडथळा येणार नाही. त्यामुळे जर जिल्हा पातळीवर अर्ज मंजूर झाला असेल, तर त्या महिलांना निश्चितच लाभ मिळेल.
हे पण वाचा » आता “लाडकी बहीण” योजनेसाठी ‘या’ नवीन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार
सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना एक मोठा धक्का!
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत किंवा ज्यांनी अद्याप अर्ज भरला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यात एक संधी आहे. या महिन्यात त्या महिला नव्याने अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु, सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना एक मोठा धक्का देखील बसणार आहे.
कारण त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रुपये दिले जाणार नाहीत. ज्यांनी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज भरला असता, त्यांना पहिल्या दोन महिन्यांचा निधी मिळाला असता. यामुळे नवीन अर्जदारांनी आता योग्य वेळेत अर्ज करून उर्वरित महिन्यांचा लाभ मिळवावा.
हे पण वाचा » शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!
या योजनेबद्दल महिलांमध्ये असलेल्या संभ्रमासंदर्भात सरकारी यंत्रणांनी वेळोवेळी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. यामुळे महिलांना त्यांच्या अर्जाच्या स्थितीबद्दल योग्य माहिती मिळेल आणि त्यांच्या शंकांचे निरसन सुद्धा होईल. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर महिलांना वेळोवेळी अपडेट्स दिले जावेत आणि त्यांना आवश्यक ती माहिती पुरवली जावी, यामुळे महिलांची चिंता दूर होण्यास मदत होईल.