Post office saving scheme: केंद्र सरकार नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवते. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना आणि विशेषतः महिलांसाठी असलेल्या महिला सन्मान बचत योजनेचा समावेश आहे. महिला सन्मान बचत योजना (Mahila Samman Savings Certificate) ही महिला आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी एक विशेष योजना आहे, जी महिलांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा देते. चला या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
१. कोण उघडू शकतं खातं?
महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील कोणतीही महिला स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकते. तसेच, जर गुंतवणूकदार अल्पवयीन मुलगी असेल, तर तिचे पालक किंवा कायदेशीर पालक तिच्या वतीने हे खाते उघडू शकतात.
योजनेत सहभाग घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा अर्ज घ्यावा लागतो. फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरून, आवश्यक कागदपत्रं जोडून, खाते उघडण्यासाठी किमान रक्कम भरून अर्ज सादर करावा लागतो.
२. गुंतवणुकीसाठी आवश्यक रक्कम
महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणुकीसाठी किमान रक्कम १,००० रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत असते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी अधिक रक्कम भरून हवी तशी गुंतवणूक करता येते.
अधिकतम गुंतवणूक मर्यादा २ लाख रुपये आहे, त्यामुळे या योजनेत कमी गुंतवणुकीतही चांगला परतावा मिळतो. योजनेचा मुदतवाढ कालावधी दोन वर्षांचा आहे, ज्यात तिमाही चक्रवाढ व्याज पद्धतीनं व्याज दिलं जातं.
३. किती मिळतं व्याज?
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत सरकारने व्याजदर स्थिर ठेवला असून या योजनेत तिमाही चक्रवाढ व्याज मिळते. सध्या, या योजनेवर ७.५% वार्षिक व्याजदर लागू आहे, ज्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.
या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर आयकर लागू होतो, त्यामुळे खातेदारांना त्यांचे उत्पन्नानुसार कर भरावा लागतो. जर खातेदारांना अचानक पैशांची गरज असल्यास, खाते उघडल्याच्या एक वर्षानंतर खात्यातील ४०% रक्कम काढता येते.
४. प्री-मॅच्युअर क्लोजर आणि अतिरिक्त सुविधा
महिला सन्मान बचत योजनेत खातेदारांसाठी प्री-मॅच्युअर क्लोजरची सुविधा उपलब्ध आहे. खाते उघडल्याच्या ६ महिन्यांनंतर खातेदार या योजनेतून बाहेर पडू शकतात, परंतु असे केल्यास त्यांना २% कमी व्याज मिळेल. विशेषतः अचानक येणाऱ्या आर्थिक आवश्यकतेसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते.
५. योजनेचा कालावधी
ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली आहे आणि ती मार्च २०२५ पर्यंतच उपलब्ध आहे. या कालावधीत महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संपर्क साधावा. त्या ठिकाणी अधिक सविस्तर माहिती देखील खातेदारांना दिली जाते.
हे पण वाचा » शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नुकसान भरपाईचे 13800 रुपये! पहा यादी
हे पण वाचा » 4 लाख रुपयांचा सौरपंप मोफत! शेतकऱ्यांनो ‘येथे’ लगेच अर्ज करा..अर्ज सुरू झाले!