PMJAY Yojana Diwali update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जेष्ठ नागरिकांसाठी दिवाळीच्या निमित्ताने एक विशेष योजना जाहीर केली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी आयुष्मान भारत “निरामयम” नावाची नवीन आरोग्य योजना सुरू केली, जी 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी आहे. या योजनेसाठी 12,850 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ती सुमारे 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटीहून अधिक जेष्ठ नागरिकांना लाभदायी ठरणार आहे.
काय आहे आयुष्मान भारत “निरामयम” योजना?
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) मध्ये आता विशेषरित्या जेष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे. या योजनेत कोणतीही उत्पन्न मर्यादा नसणार आहे, म्हणजेच कोणत्याही उत्पन्न गटातील 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक लाभ घेऊ शकतात.
याआधी, ही योजना केवळ कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी होती; मात्र, नवीन योजनेत कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट राहणार नाही. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतील. वार्षिक पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा लाभ मिळवण्याची सुविधा, ही योजना देशातील लाखो वृद्धांना आरोग्य सुरक्षिततेचा आश्वासक आधार देईल.
योजनेचा लाभ कसा मिळणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. जे कुटुंब या योजनेत नव्याने समाविष्ट होतील, त्यांना 29 ऑक्टोबरपासून विशेष आयुष्मान कार्ड मिळू शकते. हे कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ किंवा आयुष्मान ॲप द्वारे उपलब्ध असेल.
लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना ही योजना सुलभतेने वापरता येईल. ज्येष्ठ नागरिकांकडे जर खाजगी आरोग्य विमा असेल, तर त्यांना या नव्या योजनेंतर्गत आयुष्मान भारत योजना किंवा खाजगी विमा यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार निर्णय घेता येईल.
पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
या घोषणेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील जेष्ठ नागरिकांची माफी मागितली. या दोन्ही राज्य सरकारांनी (दिल्लीतील आम आदमी पार्टी आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकार) आयुष्मान भारत योजना अद्याप लागू केलेली नाही.
त्यामुळे या राज्यांतील जेष्ठ नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मोदींनी या राज्य सरकारांनी लवकरात लवकर योजना स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे पण वाचा » पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या..
हे पण वाचा » शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नुकसान भरपाईचे 13800 रुपये! पहा यादी