BSNL चा नवा रीचार्ज प्लॅन! 298 रुपयांत मिळणार भरघोस डेटा, वैधता 52 दिवसांची..

BSNL new cheap recharge plans: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. 298 रुपयांचा हा नवीन प्लॅन, ज्याची वैधता 52 दिवस आहे, त्यात युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 1GB डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात. यामुळे वारंवार रिचार्ज न करता जास्तीत जास्त कॉलिंग आणि मर्यादित इंटरनेट वापरणाऱ्या युजर्ससाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

BSNL 298 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

BSNL च्या या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. रोज 100 एसएमएस मोफत मिळतात, ज्यामुळे युजर्सना मेसेजिंगसाठीही स्वतंत्र खर्च करावा लागत नाही. 52 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1GB हाय-स्पीड डेटा मिळतो, एकूण 52GB डेटा वापरता येतो. यामुळे हलक्या वापरासाठी हा प्लॅन उपयुक्त आहे.

हे पण वाचा:  दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव 'इतका' झाला! | MCX Gold rate fall

BSNL चे इतर आकर्षक प्लॅन्स

BSNL ने युजर्ससाठी विविध प्लॅन्स सादर केले आहेत, जे त्यांच्या गरजेनुसार निवडता येतात:

1. BSNL 269 रुपयांचा प्लॅन

  • वैधता: 30 दिवस
  • डेटा: रोज 2GB डेटा (एकूण 60GB डेटा)
  • कॉलिंग: अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग
  • एसएमएस: रोज 100 एसएमएस
  • इतर फायदे: BSNL ट्यून्स, चॅलेंज एरिना गेम्स, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट, पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाइल गेम सर्व्हिस, लोकधुन, आणि झिंग सब्सक्रिप्शन.
हे पण वाचा:  या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद! लवकर करा 'हे' काम | Ration Card eKYC last date

2. BSNL 299 रुपयांचा प्लॅन

  • वैधता: 30 दिवस
  • डेटा: रोज 3GB डेटा (एकूण 90GB डेटा)
  • कॉलिंग: अनलिमिटेड कॉलिंगसह नॅशनल रोमिंग (दिल्ली आणि मुंबईसह)
  • एसएमएस: रोज 100 एसएमएस

3. BSNL 249 रुपयांचा प्लॅन

  • वैधता: 45 दिवस
  • डेटा: रोज 2GB डेटा (एकूण 90GB डेटा)
  • कॉलिंग आणि एसएमएस: अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस

BSNL कडे ग्राहकांचा कल वाढू लागला

BSNL ने सादर केलेल्या या नवीन आणि परवडणाऱ्या प्लॅन्समुळे, जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया (Vi) यांसारख्या खासगी कंपन्यांना देखील आपले प्लॅन्सबद्दल पुनर्विचार करावा लागेल. ग्राहकांना चांगली सेवा स्वस्त दरात मिळावी, या उद्देशाने BSNL ने हे प्लॅन्स आणले आहेत. जर जास्तीत जास्त युजर्स BSNL कडे वळले, तर भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल घडून येईल.

हे पण वाचा:  घरबसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची? स्टेटस कसं चेक करायचं? पहा..

हे पण वाचा » झटक्यात लखपती व्हा! पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळवा 3 लाख; ही कागदपत्रं आवश्यक..

हे पण वाचा » महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!