मतदार यादीत स्वतःचे नाव कसे तपासायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी ऑनलाइन पद्धत!

How to check your name in voter list: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, आणि सध्या निवडणूक आयोगाने तयारीला लागले आहे. मतदार यादीत दुरुस्ती करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे, ही सर्व कामे निवडणूक आयोगाकडून केली जात आहेत. या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या मताचा योग्य वापर करण्यासाठी, तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग मतदार यादी मध्ये आपले नाव कसे तपासायचे ते आपण जाणून घेऊ..

निवडणूक काळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणं अत्यंत आवश्यक आहे. दर निवडणुकीत काही मतदारांना त्यांच्या नावांची नोंद यादीत नसल्याचं समजतं, आणि त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. हे टाळण्यासाठी निवडणुकीपूर्वीच आपलं नाव यादीत आहे की नाही, हे तपासून घेणं महत्त्वाचं आहे.

मतदानाचा हक्क

मतदान हा आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावणं ही केवळ जबाबदारी नाही, तर तो एक महत्त्वाचा अधिकार आहे. योग्य उमेदवार निवडून दिल्याने देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत हातभार लागतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावा आणि आपल्या पसंतीचा उमेदवार निवडन्यासाठी मतदान करावे.

हे पण वाचा:  आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट! लगेचंच करा ‘हे’ काम, नाहीतर… | Aadhaar card big update

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑनलाईन पद्धतीने नाव तपासणं सोपं झालं आहे, त्यामुळे मतदारांनी याचा फायदा घेतला पाहिजे. यादीत नाव नसल्यास नवी नोंदणी करून मतदारांनी आपली जबाबदारी आणि हक्क यांचा योग्य वापर करावा.

मतदार यादीत नाव कसं तपासायचं?

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूप सोपं आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरी बसून करू शकता. मतदारांसाठी दोन मुख्य पर्याय दिलेले आहेत, ते आपण जाणून घेऊ!

1. महाराष्ट्र सरकारची वेबसाईट:

  • https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव तपासू शकता.
  • या वेबसाईटवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील – “सर्च नेम” आणि “आयडी कार्ड क्रमांक”.
  • सर्च नेम पद्धतीत तुम्हाला तुमचं नाव, जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, या संस्थेचं नाव यासारखी माहिती भरून नाव तपासता येईल.
  • आयडी कार्ड क्रमांक पद्धतीने तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकूनही तुमचे नाव शोधू शकता.
हे पण वाचा:  महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देणार, अजित पवारांची मोठी घोषणा!

हे पण वाचा » एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान कार्ड काढता येते? सरकारनं नुकताच ‘या’ नियमात केला बदल

2. केंद्रीय निवडणूक आयोगाची वेबसाईट:

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर (https://electoralsearch.eci.gov.in/) देखील तुम्ही मतदार यादीतील आपले नाव तपासू शकता. पुढील तीन पद्धती द्वारे नाव शोधता येईल, चला तर मग जाणून घेऊ!

  • मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर: येथे तुम्ही मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून आणि महाराष्ट्र राज्य निवडून, कॅप्चा कोड टाकून नाव तपासू शकता.
  • सविस्तर माहिती नोंदवून: यात मतदाराचं नाव, जन्मतारीख, वय, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघासह इतर माहिती भरून नाव तपासता येईल.
  • मोबाईल क्रमांकाचा वापर: मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर आलेल्या ओटीपीद्वारे सुद्धा तुमचं नाव तपासता येईल.
हे पण वाचा:  महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कधी आणि किती रुपयांनी? जणून घ्या..

हे पण वाचा » आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..

नाव नसेल तर काय करावं?

जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल, तर तुम्ही त्वरित तुमच्या मतदार नोंदणी कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुमची नवी नोंदणी किंवा नाव दुरुस्ती करून घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुद्धा सोपी आहे.

मतदार ओळखपत्र हे प्रत्येक मतदाराचं महत्त्वाचं दस्तऐवज आहे. मतदानाच्या दिवशी हे कार्ड सोबत बाळगणं आवश्यक आहे, कारण यामुळे तुम्हाला तुमचं मतदान केंद्र आणि मतदार यादीतील तुमची नोंद मिळू शकते. मतदार ओळखपत्रावर चुकीची माहिती असल्यास ती निवडणुकीपूर्वी दुरुस्त करून घेणं देखील गरजेचं आहे.