Jio ची दिवाळी निमित्त खास ऑफर! 699 रुपयांत 4G फोन, ज्यात live टीव्ही, चित्रपट, इंटरनेट सह अनेक सुविधा..

Jio 699 mobile plan details: दिवाळीच्या सणानिमित्त, रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर (Jio Diwali offer) जाहीर केली आहे. रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी यांनी भारतातील ग्राहकांना एक खास भेट देत, कमी किमतीत JioBharat फोन खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना केवळ 699 रुपयांमध्ये 4G JioBharat फोन मिळू शकतो. ही ऑफर Airtel आणि Vodafone सारख्या इतर दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे.

फक्त 123 रुपयांचे मासिक रिचार्ज

JioBharat फोनवर 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित मोफत व्हॉइस कॉलिंगसह 14 जीबी डेटा दिला जातो. मासिक रिचार्ज मधे डेटा आणि कॉलिंग सुविधा या दोन्हींचा समावेश आहे.

हे पण वाचा:  सोने दरात झाली तूफान घसरण, पहा ताजे सोन्याचे दर | Gold rate fall

Airtel आणि Vodafone पेक्षा स्वस्त

रिलायन्स जिओचा 123 रुपयांचा प्लॅन Airtel आणि Vodafone च्या समान रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत 40% स्वस्त आहे. त्यामुळे कमी खर्चात 4G इंटरनेट ग्राहकांना मिळणार आहे.

JioBharat फोनवर 30% सूट

जिओच्या दिवाळी ऑफर अंतर्गत, JioBharat फोनवर 30% सूट दिली जात आहे. यामुळे 999 रुपयांचा JioBharat फोन आता फक्त 699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही सूट दिवाळीच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी दिली जात आहे, त्यामुळे इच्छुक ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:  आधार कार्ड संदर्भात मोठी अपडेट! लगेचंच करा ‘हे’ काम, नाहीतर… | Aadhaar card big update

JioBharat फोनची वैशिष्ट्ये

JioBharat फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत, त्यापैकी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ:

  • लाइव्ह टीव्ही: 455 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स पाहण्याची सुविधा.
  • मूव्ही आणि स्पोर्ट्स: नवीन चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम्स पाहण्याचा अनुभव.
  • डिजिटल पेमेंट आणि QR कोड: JioPay द्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट्स आणि QR कोड स्कॅनिंगची सुविधा.
  • प्रिलोडेड ॲप्स: JioPay आणि JioChat सारख्या ॲप्स आधीच इन्स्टॉल केलेली आहेत.
हे पण वाचा:  दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव 'इतका' झाला! | MCX Gold rate fall

JioBharat फोन खरेदी कुठे करावा?

JioBharat फोन ग्राहक Jio स्टोअरवरून, JioMart वरून तसेच Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करू शकतात.

हे पण वाचा » सरकारकडून ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर! पहा कोणाला मिळणार..

हे पण वाचा » ‘लाडकी बहीण’ डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितले..!